अॅक्सिओम-4 हे मिशन अनेक वेळा पुढे ढकलण्यात आलं आहे. मोहिमेला प्रथम हवामानामुळे विलंब झाला, नंतर फाल्कन-9 रॉकेटमध्ये गळती आणि नंतर रशियन मॉड्यूलमधील तांत्रिक समस्यांमुळे ते पुढे ढकलण्यात आलं. अलिकडेच नासा आणि रशियाची अंतराळ संस्था रोसकॉसमॉस यांनी आयएसएसच्या झ्वेझदा सर्व्हिस मॉड्यूलमधील दुरुस्तीच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर या मोहिमेला हिरवा कंदील दाखवला आहे. सहा वेळा पुढे ढकलल्यानंतर आज अखेर हे अभियान अंतिम करण्यात आलं.
advertisement
OMG! NASA च्या बंद पडलेल्या सॅटेलाईटमधून आला मेसेज, कसा काय? शास्त्रज्ञही हैराण
अॅक्सिओम-4 मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि त्यांच्यासोबत तीन अंतराळवीर यांनी अंतराळाच्या दिशेनं झेप घेतली आहे. या मोहिमेचं नेतृत्व नासाचे माजी अंतराळवीर आणि अॅक्सिओम स्पेसच्या मानवी अंतराळ उड्डाण संचालक पेगी व्हिटसन करत आहेत. भारताच्या इस्रोशी संबंधित शुभांशू शुक्ला या मोहिमेत पायलटच्या भूमिकेत आहेत. या मोहिमेत पोलंडचे स्लावोस उज्नान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापु हे दोन अंतराळवीर देखील आहेत.
हे सर्वजण स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानातून जात आहे. दुपारी 12:01 वाजता यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी रवाना झाला. 28 तासांच्या प्रवासानंतर भारतीय वेळेनुसार 26 जुलै संध्याकाळी 4.30 वाजता हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचेल. तिथं 14 दिवस राहून संशोधन करतील.
41 वर्षांनंतर एक भारतीय अंतराळात झेपावला आहे. यापूर्वी 1984 मध्ये राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय होते. हे अभियान भारत आणि इस्रोसाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे आणि जागतिक सहकार्याद्वारे अंतराळ संशोधनात नवीन आयाम उघडण्याची अपेक्षा आहे.