advertisement

OMG! NASA च्या बंद पडलेल्या सॅटेलाईटमधून आला मेसेज, कसा काय? शास्त्रज्ञही हैराण

Last Updated:
Signal from NASA dead satellite : नासाच्या 60 वर्षे जुन्या बंद पडलेल्या उपग्रह रिले-2 ने इतका गूढ रेडिओ सिग्नल पाठवला. या घटनेने शास्त्रज्ञांना आश्चर्यचकित केलं आहे.
1/7
अवकाशात कितीतरी सॅटेलाईट आहेत. असंच एक सॅटेलाईट जे कित्येक दशकांपासून बंद होतं. पण याच सॅटेलाईटमधून अचानक मेसेज आला आहे. ज्यामुळे शास्त्रज्ञही हैराण झाले आहेत.
अवकाशात कितीतरी सॅटेलाईट आहेत. असंच एक सॅटेलाईट जे कित्येक दशकांपासून बंद होतं. पण याच सॅटेलाईटमधून अचानक मेसेज आला आहे. ज्यामुळे शास्त्रज्ञही हैराण झाले आहेत.
advertisement
2/7
शास्त्रज्ञांना अलीकडेच अवकाशातून एक अत्यंत शक्तिशाली आणि रहस्यमय रेडिओ सिग्नल मिळाला, जो काही क्षणांसाठी आकाशातील इतर सर्व वस्तूंपेक्षा जास्त चमकला.
शास्त्रज्ञांना अलीकडेच अवकाशातून एक अत्यंत शक्तिशाली आणि रहस्यमय रेडिओ सिग्नल मिळाला, जो काही क्षणांसाठी आकाशातील इतर सर्व वस्तूंपेक्षा जास्त चमकला.
advertisement
3/7
गेल्या वर्षी 13 जून रोजी ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी ऑस्ट्रेलियाच्या स्क्वेअर किलोमीटर ॲरे पाथफाइंडर टेलिस्कोप (ASKAP) वरून एक जलद आणि अत्यंत लहान रेडिओ फ्लॅश रेकॉर्ड केला. जो 30 नॅनोसेकंदांपेक्षा कमी काळ टिकतो.

4/7
कर्टिन विद्यापीठाचे क्लॅन्सी जेम्स आणि त्यांच्या टीमला सुरुवातीला वाटलं होतं की ते एक नवीन पल्सर  म्हणजे एक धडधडणारा तारा किंवा इतर काही खगोलीय वस्तू असू शकते. परंतु नंतर सिग्नलच्या स्रोताच्या विश्लेषणात असं आढळून आलं की ते पृथ्वीपासून सुमारे 20000 किलोमीटर अंतरावर असलेल्या रिले 2 सॅटेलाईटमधून आला आहे.

5/7
रिले 2 हा नासाचा एक प्रायोगिक संप्रेषण उपग्रह होता, जो रिले कार्यक्रमांतर्गत प्रक्षेपित करण्यात आलाहोता. नासाने  तो 1964 मध्ये अवकाशात पाठवला होता. 1965 मध्ये तो निकामी करण्यात आला आणि 1967 पर्यंत त्याची सर्व तांत्रिक उपकरणं पूर्णपणे निष्क्रिय झाली.
रिले 2 हा नासाचा एक प्रायोगिक संप्रेषण उपग्रह होता, जो रिले कार्यक्रमांतर्गत प्रक्षेपित करण्यात आला होता. नासाने  तो 1964 मध्ये अवकाशात पाठवला होता. 1965 मध्ये तो निकामी करण्यात आला आणि 1967 पर्यंत त्याची सर्व तांत्रिक उपकरणं पूर्णपणे निष्क्रिय झाली.
advertisement
6/7
रिले कित्येक दशकांपासून निष्क्रिय असल्याने शास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला आहे की सिग्नल हा बाह्य परिणाम असू शकतो. जसं की इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज किंवा मायक्रोमेटिओराइट टक्करमुळे निर्माण होणारा प्लाझ्मा डिस्चार्ज.

7/7
ब्रिस्टल विद्यापीठाच्या प्राध्यापक करेन ऍप्लिन यांच्या मते,
ब्रिस्टल विद्यापीठाच्या प्राध्यापक करेन ऍप्लिन यांच्या मते, "या घटनेमुळे अंतराळातील कचरा आणि इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज लहान उपग्रहांना कसा धोका निर्माण करतात हे दिसून येईल आणि ते मोजण्याचा एक नवीन मार्ग प्रदान करू शकेल." (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement