अयोध्या: अयोध्येतील यंदाचा दीपोत्सव खूप खास असणार आहे. ज्याची तयारी आधीच सुरू झाली आहे. अयोध्येत यंदा 28 ते 31 ऑक्टोबर दरम्यान दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दीपोत्सवात 25 लाखांहून अधिक दिवे लावून नवा विश्वविक्रम रचला जाणार आहे. इतकंच नाही तर भव्य दीपोत्सवाबरोबरच शरयूची महाआरतीही आकर्षक असणार आहे.
advertisement
शरयूच्या महाआरतीची नोंद करण्याची तयारीही सुरू आहे. सरयू घाटावर एकाच वेळी 1100 संत आणि विशेष लोकांच्या उपस्थितीत नदीची महाआरती होणार आहे. विशेष म्हणजे यंदाचा दीपोत्सव अत्यंत खास असणार आहे कारण रामलल्लाच्या अभिषेकानंतर हा पहिला दीपोत्सव अयोध्येत होणार आहे.
25 लाखांहून अधिक पणत्या प्रज्वलित करून नवा विश्वविक्रम रचला जाणार आहे. यासोबतच पहिल्यांदाच शरयूच्या महाआरतीचे ही आयोजन करण्यात येणार आहे. त्याचाही विश्वविक्रमही होणार आहे. याशिवाय अयोध्येतील रस्त्यांवर मिरवणूक काढण्यात येणार असून, रामकथा पार्क ते साकेत कॉलेज या राम राज्याभिषेकाच्या मार्गावर ही मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. आतापर्यंतचा संस्मरणीय ठरणाऱ्या या दीपोत्सवात प्रथमच अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
पहिली बैठक 1 सप्टेंबर रोजी होणार आहे.
पर्यटन विभागाचे उपसंचालक आर. पी. यादव यांनी सांगितले की, दीपोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. 1 सप्टेंबर रोजी अयोध्येत दीपोत्सवाची बैठक होणार असून त्यात दीपोत्सवाची रूपरेषा तयार करण्यात येणार आहे. या दीपोत्सवात 25 लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित केले जाणार आहेत. यंदाचा दीपोत्सवही ऐतिहासिक ठरणार आहे.