अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमान दुर्घटनेमुळे देशभरातून हळहळ व्यक्त केली जातेय. दोन दिवसांपूर्वीच भाविकने कोर्ट मॅरेज केलं होतं . त्यांच्या वडीलांना तर विश्वासच बसत नाही की त्यांचा मुलगा आज त्यांच्यात नाही. सनई चौघड्यांचा आवाज अजून थांबला नसतानाच भाविकच्या मृत्यूमुळे शांतता पसरली आहे. भाविकचे लग्न १० जून रोजी झाले होते.
लग्नाच्या दोन दिवसातच मृत्यूने कवटाळले
advertisement
भाविक माहेश्वरी लंडनमध्ये नोकरीला होता नुकताच काही दिवसांपूर्वी तो भारतात आला होता. वडोदरला घरी आल्यानंतर त्याचे लग्न झाले मात्र कमी सुट्ट्यांमुळे त्यांनी 10 जून रोजी कोर्ट मॅरेज केले. पुढच्या सुट्टीला भारतात आल्यानंतर लग्नाचे जोरात सेलिब्रेशन करण्याचे नियोजन होते. मात्र त्यापूर्वीच भाविकला मृत्यूने कवटाळले.
अखेरच्या कॉलमध्ये भाविक काय म्हणाला?
12 जूनला भाविकला अहमदाबाद एअरपोर्टवर निरोप देण्यासाठी त्याचे आई- वडील आणि पत्नी आली होती. भाविकला हा अखेरचा निरोप असेल याची परिवाराला कल्पना नव्हती. भाविकचे वडील अर्जुन माहेश्वरी म्हणाले, फ्लाईट टेक ऑफ करण्यापूर्वी भाविकसोबत अखेरचे बोलणे झाले बोते. बाबा, तुम्ही चिंता करू नका आता फ्लाईट उडणार आहे. मात्र अर्धा तासातच सगळं संपलं. आमची काही मागणी नाही फक्त आम्हाला आमच्या मुलाचे शरीर द्या अजून काही नको...
Watch Video :
या अपघातानंतर माहेश्वरी कुटुंबाला आपला एकुलता एक मुलगा आता या जगात नाही यावर विश्वासच बसत नाही. वडोदराच्या वाडी परिसरात राहणाऱ्या भाविकच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, दोन दिवसांपूर्वीपर्यंत घरात आनंदाचे वातावरण होते, मुलाचे लग्न झाले होते. दरवर्षीप्रमाणे भाविक कुटुंबासोबत काही दिवस सोबत घालवण्यासाठी भारतात आला होता.