सीमेपलीकडून पाक रेंजर्सने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबाराला भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (BSF) जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. बीएसएफने ही कारवाई करताना पाकिस्तान रेंजर्सच्या पोस्ट्सना थेट लक्ष्य केलं असून त्यांच्या अनेक बंकर आणि लाँचिंग पॅड्सचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. बीएसएफने या कारवाईचे व्हिज्युअल्सही प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये पाकिस्तानी रेंजर्सची झालेली वाताहात दिसून आली आहे.
advertisement
विशेष म्हणजे, बीएसएफच्या या प्रतिहल्ल्यात पाकिस्तान रेंजर्सकडून दहशतवाद्यांना भारतात घुसखोरीसाठी वापरले जाणारे अनेक "टेरर लॉन्च पॅड"ही उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. हे लॉन्च पॅड म्हणजे घुसखोरीच्या कारवाया सुरू करण्यासाठीचे मुख्य तळ होते. बीएसएफच्या अचूक लक्ष्यवधामुळे हे केंद्र जमीनदोस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरही पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रीसंधीचे उल्लंघन करण्यात येत होते. मात्र बीएसएफ जवानांनी पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर दिलं आहे.
या कारवाईनंतर सीमाभागात बीएसएफने सतर्कता वाढवली असून कोणतीही घुसखोरी न होण्यासाठी नियंत्रण रेषेवर उच्च पातळीवर गस्त वाढवण्यात आली आहे.