सीबीआयने केलेल्या शोध मोहिमेदरम्यान २५ बँक खाती आणि लॉकर देखील सापडले आहेत. विविध बँकांमधील खात्यांचे कागदपत्रे आणि एक लॉकर सापडले. सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरनुसार, आरोपी अधिकारी अमित कुमार सिंघल यांनी ४५ लाख रुपयांची बेकायदेशीर वसुली मागितल्याचा आरोप करण्यात आला. धमकी देऊन खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आयकर विभागाच्या कारवाईची भीती दाखवून लाच मागितली गेल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
advertisement
सिंघल यांच्यावरील कारवाईनंतर सीबीआयने अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवली. सीबीआयच्या शोध मोहिमेत सुमारे ३.५ किलो सोने, २ किलो चांदी आणि १ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. सिंघल २००७ बॅचचे भारतीय महसूल सेवेचे अधिकारी आहेत. सध्या नवी दिल्लीत एडीजी म्हणून कार्यरत. सीबीआयच्या तपासात सिंघल यांच्याकडे मोठी मालमत्ता उघडकीस आली आहे. दिल्ली, मुंबई आणि पंजाबमध्ये असलेल्या जंगम आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे सापडली आहेत.