आता असा काय बदल झाला की हे दहशतवादी, जे इतके दिवस सापडत नव्हते, त्यांना शोधून काढण्यात आलं आणि ठार केलं गेलं? यामागे आहे एक विशेष तंत्रज्ञान – चायनीज अल्ट्रा रेडियो कम्युनिकेशन सिस्टीम. ऑपरेशन महादेवमागची ही प्रत्येक गोष्ट आता उघड झाली आहे.
ऑपरेशन महादेवची Inside story: त्या कॉलनंतर चिनार कॉर्प्सने सुरू केलं तांडव
advertisement
पहलगाम हल्ल्यापासून ऑपरेशनपर्यंतचा प्रवास
पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, फिजिकल आणि इलेक्ट्रॉनिक सर्विलन्स यांचा वापर करून दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. ड्रोन, थर्मल इमेजिंग आणि ह्युमन इंटेलिजन्स नेटवर्कच्या सहाय्याने हालचालींवर नजर ठेवली जात होती.
याच दरम्यान एक धक्कादायक सुराग समोर आला – घनदाट जंगलात चायनीज अल्ट्रा रेडियो कम्युनिकेशन सिस्टम अॅक्टिव्ह झाल्याचं सिग्नल मिळालं. याच सिस्टमद्वारे लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी एन्क्रिप्टेड मेसेजच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्कात होते. यानंतर लष्कराला हे लक्षात आलं की दहशतवादी कोणत्या भागात लपले आहेत आणि लगेच ‘ऑपरेशन महादेव’ सुरू करण्यात आलं.
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसा खल्लास, भारतीय लष्कराचं थरारक ऑपरेशन
चायनीज अल्ट्रा रेडियो कम्युनिकेशन म्हणजे काय?
चायनीज अल्ट्रा रेडियो कम्युनिकेशन ही एक हायटेक रेडियो कम्युनिकेशन प्रणाली आहे. जी हाय फ्रिक्वेन्सी आणि अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी (UHF) बँडचा वापर करते. हे तंत्रज्ञान मजबूत एन्क्रिप्शनसह संवाद शक्य करतं आणि विशेष म्हणजे दुर्गम, डोंगराळ भागांमध्येही हे उत्तम कार्य करतं.
2026 मध्ये हे ‘WY SMS’ या नावाने ओळखलं जायचं आणि दहशतवादी संघटनांसाठी सुरक्षित कम्युनिकेशन चॅनेल म्हणून याचा वापर होत होता. हे सिस्टीम चीनच्या कंपनीने बनवलं असून अनेक दहशतवादी गट याचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. सुरक्षा यंत्रणांनुसार याची खासियत म्हणजे याचे सिग्नल जाम करणं फार कठीण आहे. त्यामुळे हे दहशतवाद्यांचं आवडतं साधन बनलं आहे.
ऑपरेशन महादेवचा गेमचेंजर क्षण
सुरक्षा यंत्रणांना जेव्हा या अल्ट्रा रेडियोच्या अॅक्टिव्हेशनचा सिग्नल मिळाला. तेव्हा ‘ऑपरेशन महादेव’ तातडीनं लॉन्च करण्यात आलं. ड्रोन आणि इंटेलिजन्स इनपुटच्या आधारे माउंट महादेव परिसरात दहशतवाद्यांचे ठिकाणे ट्रॅक करण्यात आली.
28 जुलैच्या सकाळी सुरक्षा दलांनी संपूर्ण भागाला घेरलं. सहा तास चाललेल्या चकमकीत AK-47, ग्रेनेड्स आणि IEDसह अनेक हत्यारं जप्त करण्यात आली. हीच ती हत्यारं होती जी पहलगाम हल्ल्यात वापरण्यात आली होती.
सूत्रांनी सांगितलं की, या ऑपरेशनमध्ये अल्ट्रा रेडियो सिस्टीमच्या सिग्नलने दहशतवाद्यांच्या लोकेशन ट्रॅक करण्यास मोठी मदत झाली. ज्यामुळे त्यांना वेळीच घेरून मारण्यात यश आलं.
