'ऑपरेशन महादेव'ची Inside story:'त्या' फोन कॉलनंतर चिनार कॉर्प्सने सुरू केलं मृत्यूचे तांडव, दाचिगाम जंगलात गुप्त ठिकाण कसं सापडलं?
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Operation Mahadev: पहलगाम हल्ल्यानंतर निष्क्रिय असलेला सॅटेलाइट फोन दोन दिवसांपूर्वी पुन्हा सक्रिय झाला आणि त्याच क्षणी भारतीय गुप्तचर यंत्रणांनी लक्ष केंद्रित केलं. या सिग्नलवरून मिळालेल्या सुरागाच्या आधारे दाचिगाम जंगलात 'ऑपरेशन महादेव' राबवून तीन लष्कर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
श्रीनगर: 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तपासाअंतर्गत असलेल्या एका कम्युनिकेशन डिव्हाइसमुळे दाचिगाम जंगलातील दहशतवाद्यांचे ठिकाण उघड झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीएनएन-न्यूज18 या वाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी या डिव्हाइसवरून आलेल्या एका संशयित कॉलमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली होती.
याच माहितीच्या आधारे तपास अधिक खोलवर नेण्यात आला आणि सोमवारी दाचिगाम जंगलात मोठे ऑपरेशन राबवण्यात आले.
पहलगाम हल्ल्यात वापरले गेलेले हुवावे कंपनीचे सॅटेलाइट फोन पुन्हा वापरात आल्याचे निदर्शनास आले. या फोनचा हल्ल्यानंतर वापर झालेला नव्हता. मात्र दोन दिवसांपूर्वी अचानक या फोनवरून एक कॉल करण्यात आला होता. त्या कॉलच्या आधारे डिव्हाइसची लोकेशन ट्रॅक करण्यात आली आणि ते ठिकाण दाचिगाम जंगलाच्या अतिशय आत असल्याचे आढळून आले – जिथे माणसांची वस्ती नाही.
advertisement
दाचिगाम येथे सोमवारी झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख ‘पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड’ हाशिम मुसा अशी झाली आहे. अन्य दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
हे दहशतवादी पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित असावेत, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याआधी एनआयएने अटक केलेल्या परवेज आणि बशीर अहमद या दोन स्थानिक समर्थनकर्त्यांनी देखील पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानातील लष्करच्या तीन दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे सांगितले होते.
advertisement
दाचिगाम चकमकीत मारले गेलेले दहशतवादी कोण आहेत, हे ओळखण्यासाठी सध्या ड्रोन फोटोग्राफीचा वापर केला जात आहे. या छायाचित्रांची तुलना अटकेत असलेल्या समर्थनकर्त्यांकडून केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ऑपरेशन महादेव यशस्वी
सोमवारी सुरक्षा दलांनी श्रीनगरजवळील दाचिगाम जंगलाच्या वरच्या भागात तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. सकाळी परिसरात गोळीबाराच्या आवाजामुळे कारवाई सुरू करण्यात आली. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीनही दहशतवादी परदेशी नागरिक होते आणि लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित होते.
advertisement
ऑपरेशन महादेव - लिडवास परिसरात संपर्क प्रस्थापित. ऑपरेशन सुरू आहे, असे श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्सने X हँडलवर पोस्ट केले.
सुरक्षा दलांनी हरवाण परिसरातील मुलनार भागात शोध मोहीम सुरू केली होती. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शोधमोहीम सुरू असताना दूरवरून दोन फायरिंगचे आवाज ऐकू आले. त्यानंतर अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आणि शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली. या मोहिमेद्वारे दहशतवाद्यांना शोधून काढण्यात आले आणि ठार करण्यात आले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 28, 2025 3:58 PM IST
मराठी बातम्या/देश/
'ऑपरेशन महादेव'ची Inside story:'त्या' फोन कॉलनंतर चिनार कॉर्प्सने सुरू केलं मृत्यूचे तांडव, दाचिगाम जंगलात गुप्त ठिकाण कसं सापडलं?


