पलामू, 9 डिसेंबर : जमीन, हवा, पाणी अशा तीनही स्तरांवर आपले जवान दिवसरात्र देशाचं संरक्षण करत असतात म्हणूनच आपण सर्वत्र निर्भयपणे वावरू शकतो. अगदी वाहतूक हवालदारापासून लष्कराच्या कमांडरपर्यंत सर्वच जवान जनतेच्या आयुष्याचं रक्षण करतात. सध्या एका CRPF जवानाची सुट्टी चांगलीच चर्चेत आली आहे. कारण त्यांनी या सुट्टीत चक्क 1300 किलोमीटरचा सायकल प्रवास सुरू केलाय.
advertisement
झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील मेदिनीनगरमध्ये नावाटोलीचे रहिवासी निशाद आलम हे 2004 सालापासून CRPF म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांना लहानपणापासूनच देशसेवा करायची होती. ज्यासाठी प्रयत्न करून त्यांनी आपलं स्वप्न साकार केलं. तर, आता सुट्टीतदेखील आराम करणं त्यांना पटत नाहीये. त्यांचा सायकल प्रवास हा लोकांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी आहे. पलामू जिल्ह्यातून सुरू झालेला हा प्रवास राजधानी दिल्लीच्या संसद भवनापर्यंत असेल.
आईच्या सल्ल्यानं सुरू केला व्यवसाय, दोघा भावांची महिन्याकाठी लाखोंची कमाई, Video
पृथ्वीवर 75 टक्के जलसाठा आहे, परंतु त्यापैकी पिण्यायोग्य पाणी हे केवळ 3 टक्केच आहे. शिवाय भूगर्भातील जलस्तर दिवसेंदिवस खालावतोय. त्यामुळे पाण्याचा गैरवापर करू नये. प्रदूषणविरहित आयुष्य जगायचं असेल तर सर्वत्र स्वच्छता राखावी, असा संदेश देणं हेच निशाद आलम यांच्या या प्रवासामागचं उद्दिष्ट आहे. यासाठी यूट्यूबवरून प्रेरणा मिळाल्याचं ते सांगतात. त्यानुसार 8 डिसेंबर रोजी सुरू झालेला त्यांचा प्रवास झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि मग दिल्ली असा असेल.
निशाद यांनी यंदा 27 सप्टेंबर रोजी रांचीच्या डोरंडा ते मेदिनीनगर असा 180 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पार केला होता. दरम्यान, आता सुरू असलेला प्रवास पूर्ण होताच ते संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात आपलं पर्यावरण संरक्षणाबाबतचं निवेदन सादर करतील.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g