कॅनडा
गेल्या काही महिन्यांपासून भारतासाठी नंबर एकचा शत्रू बनलेल्या कॅनडाला ट्रम्प यांच्या विजयाने सुरक्षा आणि खलिस्तान समर्थक प्रकरणी गंभीर आणि स्पष्ट संदेश जाईल. अमेरिका आणि कॅनडात खलिस्तानी हालचाली वाढल्यानं गेल्या काही महिन्यात भारताला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कॅनडात भारतीय हिंदूंची सुरक्षा धोक्यात आलीय. ट्रम्प यांच्या प्रशासनात अमेरिकेत भारतीय हिंदूंना खलिस्तानींकडून असलेल्या धोक्यांकडे आणि धमक्यांकडे दुर्लक्ष होणार नाही. बांगलादेशमधील हिंदूंच्या मुद्द्यांवर ट्रम्प यांनी वक्तव्य करून हे स्पष्ट केलंय. दुसरीकडे कॅनडातील ट्रुडो सरकारकडून भारताविरोधी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या खलिस्तानी समर्थकांचा आवाजही कमी होईल.
advertisement
चीन
ट्रम्प यांच्या विजयामुळे भारताचा शेजारी देश चीनचा आवाजही कमी होईल. चीनच्या तुलनेत अमेरिका भारताला झुकतं माप देते. कारण जगात व्यापारामध्ये चीन अमेरिकेला आव्हान बनू नये अशी त्यांची इच्छा आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होताच अमेरिका चीनवर टॅरिफ वाढवू शकते. यामुळे चीनची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. ट्रम्प याआधी चीनसोबतच्या ट्रेड वॉरबद्दल बोलले आहेत. अमेरिका चीनवर असलेलं अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नात राहील. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांवर त्याची पुरवठा साखळी दुसऱ्या देशांमध्ये स्थलांतरित करण्याचा दबाव असेल. याचा थेट फायदा भारताला होईल. कारण ज्या कंपन्यांना त्यांच्या पुरवठा साखळीत वैविध्य आणायचं आहे त्या भारताकडे वळू शकतात.
Donald Trump : कोण आहेत काश पटेल? ट्रम्प यांचा गुजराती 'मित्र', मिळणार मोठी जबाबदारी
याशिवाय हिंद-प्रशांत महासागरात चीनला रोखण्यासाठी QUADला शक्तिशाली बनवण्याचा प्रयत्न ट्रम्प करतील. याची सुरुवात पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या क्वाड लीडर्स संमेलनापासून होऊ शकते. ट्रम्प या संमेलनात उपस्थित राहू शकतात. ज्यो बायडेन यांनी त्यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात चीनसोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या वादाबाबद कोणतंही विधान केलं नाही. पण ट्रम्प यांच्याकडून अशी भूमिका घेतली जाणार नाही.
पाकिस्तान
पाकिस्तानातून सीमेपलिकडं दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम केलं जातं. यावर ट्रम्प यांच्याकडून स्पष्ट संदेश आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावरून खडेबोल सुनावले आहेत. इतकंच नाी तर पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणारी आर्थिक रसदही थांबवली. यामुळे पाकिस्तान आर्थिक संकटात आहे. अशा स्थितीत दहशतवादाच्या कोणत्याही मुद्द्यावर पाकिस्तानला ट्रम्प यांची नाराजी परवडणारी नाही. यामुळे त्यांना इतर संघटनांकडून मिळणारी रसदही थांबू शकते.
बांगलादेश
दिवाळीच्या निमित्ताने धर्मविरोधी अजेंड्याअंतर्गत हिंदू अमेरिकनांच्या सुरक्षेबद्ल बोलणाऱ्या ट्रम्प यांनी बांग्लादेशमध्ये हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध केलाय. बांगलादेशमधील युनूस सरकारलासुद्धा ट्रम्प यांनी निवडणुकीआधी स्पष्ट संदेश दिला होता. ज्यो बायडेन आणि युनूस यांची जवळीक जगजाहीर आहे. पण ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होताच युनूस सरकारची कोंडी होऊ शकते. ट्रम्प यांच्यासोबत मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवण्यासाठी युनूस सरकारला भाग पाडतील.
