ट्रम्प यांच्याकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा रविवारी ट्रुथवर पोस्ट करत पुन्हा श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही दूरच्या शेजाऱ्यांसोबत व्यापार वाढवतील आणि काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्यासोबत काम करतील. अमेरिका तुम्हाला या ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकली, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
advertisement
Donald Trump यांची पोस्ट
भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत आणि अटल शक्तिशाली नेतृत्वाचा मला खूप अभिमान आहे, कारण त्यांच्याकडे हे जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची ताकद, शहाणपण आणि धैर्य आहे की सध्याच्या आक्रमकतेला थांबवण्याची वेळ आली आहे. ज्यामुळे इतक्या आणि इतक्या लोकांचा मृत्यू आणि विनाश होऊ शकला असता, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
लाखो चांगले आणि निष्पाप लोक मरण पावले असते. तुमच्या धाडसी कृतींमुळे तुमचा वारसा खूप वाढला आहे. मला अभिमान आहे की अमेरिका तुम्हाला या ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकली. चर्चा झाली नसली तरी, मी या दोन्ही महान राष्ट्रांसोबत व्यापारात लक्षणीय वाढ करणार आहे, असंही ट्रम्प यावेळी म्हणाले.
दरम्यान, या व्यतिरिक्त "हजारो वर्षांनंतर" काश्मीरबाबत तोडगा निघू शकतो का हे पाहण्यासाठी मी तुमच्या दोघांसोबत काम करेन. भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाला चांगल्या प्रकारे केलेल्या कामासाठी देव आशीर्वाद देवो, असं म्हणत ट्रम्प यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला आहे.