रोहिणी यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ती चंद्रशेखरची पीडिता क्रमांक ३ आहे, जिचे चंद्रशेखर आणि त्यांच्या कुटुंबाने शोषण केले होते. या पोस्टमध्ये रोहिणी यांनी असेही लिहिले आहे की या मुलीसोबत जे घडले तसेच त्याने (चंद्रशेखर) माझ्यासोबतही असेच केले, म्हणून आता मी सर्व मुलींना न्याय मिळवून देईन. चंद्रशेखर आझादने मला वापरून सोडलं. बहीण-मुलींची इज्जत त्यासाठी काहीच नाहीये, असा आरोपही रोहिणीने केला.
advertisement
डॉ. रोहिणी घावरी ही इंदूरच्या बीमा रुग्णालयात काम करणाऱ्या सफाई कामगाराची मुलगी आहे. ती २०१९ मध्ये उच्च शिक्षणासाठी स्वित्झर्लंडला गेली होती. शिक्षण घेत असताना ती आणि चंद्रशेखर एकमेकांच्या संपर्कात आले आणि तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. त्यानंतर आता तिने एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहून चंद्रशेखर आझादवर गंभीर आरोप केले आहेत.
एका महिलेला फसवून दुसरीकडे जाणे आणि दुसरीला फसवून तिसरीकडे जाणे, ही नामर्दाचं लक्षण आहे. ज्याच्या रक्तात फसवणूक आणि विश्वासघात आहे, तो समाजाचा काय होणार? तो आजपर्यंत दलित समाजाचा सर्वात कलंकित नेता आहे, त्याच्या आधी इतका नीच कोणी नव्हता!! तो बहुजन चळवळीला कलंक आहे, असं ट्वीट करत रोहिणीने घावरीने चंद्रशेखर आझादवर टीकास्त्र सोडलं आहे.