हायड्रॉलिक बिघाडामुळे हे विमान मागील 48 तासांपासून जमिनीवरच अडकले आहे. या जेटला पुन्हा HMS वेल्सकडे परतावे लागणार आहे. मात्र याचा संपूर्ण घटनाक्रम अनपेक्षित राहिला. त्रिवेंद्रममध्ये F-35B फायटर जेटची आपत्कालीन लँडिंग ही अमेरिकेच्या दाव्यांची पोलखोल करणारी ठरली आहे.
अमेरिका आणि इंग्लंड यांच्यातर्फे सतत दावा केला जातो की हे पाचव्या पिढीचे लढाऊ विमान आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे रडारवर पकडले जात नाही. मात्र गंमत म्हणजे भारतीय वायुदलाने काही क्षणांतच हे फायटर जेट डिटेक्ट केले. भारतीय वायुदलाच्या इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टिमने (IACCS) F-35 ओळखले आणि त्याची पुष्टीही केली. उड्डाण सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय वायुदलाने विमानाला उतरवण्यास मदत केली.
advertisement
F-35 तिरुवनंतपुरमला कसे पोहोचले?
ब्रिटनचे F-35 फायटर जेट HMS वेल्स या कॅरिअर स्ट्राइक ग्रुपचा भाग आहे. अलीकडेच भारतीय लष्करासोबत सामूहिक सैन्य सरावात सहभागी झाले होते. हे विमान अरबी समुद्रात तैनात आहे. शनिवार रात्री 9:20 वाजता F-35B फायटर जेट कॅरिअरवर लँडिंग करताना अपयशी ठरले. त्यानंतर इमर्जन्सी डायव्हर्जन घेत त्रिवेंद्रमच्या दिशेने उड्डाण झाले. भारतीय वायुदलाच्या IACCS प्रणालीने F-35 डिटेक्ट केले. F-35 च्या पायलटने तांत्रिक कारण देत आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. लँडिंगनंतर समजले की विमानात हायड्रॉलिक सिस्टीममध्ये बिघाड आहे. त्यामुळे पुन्हा उड्डाणाची परवानगी दिली जाऊ शकत नाही.
ही असामान्य घटना
भारतीय वायुदलाने सांगितले की ही घटना नक्कीच असामान्य आहे, पण गंभीर नाही. एखाद्या विदेशी स्टेल्थ फायटर जेटचे 48 तासांहून अधिक काळ भारतात जमिनीवर राहणे ही नक्कीच विशेष बाब आहे. F-35 हे छोटे रनवे किंवा विमानवाहू युद्धनौकांवरून शॉर्ट टेक ऑफसाठी डिझाईन केलेले आहे.
एकाच वेळी शेकडो टार्गेट्स ट्रॅक करू शकते
या विमानाच्या इंजिनपासून ते टर्बाइनपर्यंत सर्व काही मास्किंगसह झाकले गेले आहे. क्षेपणास्त्रे वगैरे विमानाच्या आतल्या भागात ठेवली जातात. F-35 एकाच वेळी शेकडो लक्ष्य ट्रॅक करून त्यावर हल्ला करू शकते. यामध्ये अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड अॅरे (AESA) रडार बसवले गेले आहे. यामध्ये असलेली डिस्ट्रिब्यूटेड अॅपर्चर सिस्टीम (DAS) पायलटला 360 डिग्रीचा दृष्टीकोन देते.
या घटनेमुळे अमेरिका आणि इंग्लंडच्या F-35B संदर्भातील दाव्यांची पोलखोल झाली आहे. दोन्ही देश म्हणतात की F-35 रडारवर पकडला जात नाही. पण भारतीय वायुदलाच्या IACCS प्रणालीने ते सहजपणे डिटेक्ट केले.
