TRENDING:

'या' योजनेमुळे शेतकरी कुटुंब मालामाल; आता वर्षाला 12 लाख झालं उत्पन्न

Last Updated:

शेतीतून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळू शकतं, मात्र शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शेती करावी, असं कृषीतज्ज्ञ वारंवार सांगतात. हाच सल्ला या कुटुंबाने पाळला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आशुतोष तिवारी, प्रतिनिधी
फार पूर्वीपासून शेती करणारं हे कुटुंब. मात्र आता त्यांच्याकडील पनीरला जबरदस्त मागणी असते.
फार पूर्वीपासून शेती करणारं हे कुटुंब. मात्र आता त्यांच्याकडील पनीरला जबरदस्त मागणी असते.
advertisement

रीवा, 15 ऑगस्ट : सरकारकडून सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबवल्या जातात. मात्र त्यापैकी बऱ्याच योजनांची आपल्याला पुरेशी माहिती नसते. त्यामध्ये अशाही काही योजना असतात, ज्यांचा वापर करून आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. अर्थात व्यवसाय म्हटला की जोखीम आलीच. मात्र अभ्यासपूर्ण व्यवसाय केला आणि तो यशस्वी झाला की व्यक्ती मालामाल होते, हेदेखील तितकंच खरं आहे.

advertisement

मध्यप्रदेशातील देव कुटुंब याचं उत्तम उदाहरण आहे. फार पूर्वीपासून शेती करणारं हे कुटुंब. मात्र आता त्यांच्याकडील पनीरला जबरदस्त मागणी असते. त्यांनी शेतीपूरक व्यवसाय सुरू करून दूध उत्पादन घेतलं, असा विचार आपण करत असाल, तर तो अगदी बरोबर आहे. देव कुटुंबीयांनी शिवराज सिंह सरकारच्या आचार्य विद्यासागर गौ संवर्धन योजनेचा पुरेपूर उपयोग केला. या योजनेतूनच त्यांनी शेतीच्या जोडीला दूध उत्पादन सुरू केलं आणि त्यांचं जणू नशीबच पालटलं.

advertisement

पाण्याच्या अभावामुळे पारंपरिक शेती सोडली, फुलवला बगीचा; 3 बिघ्यात केली 4 लाखांची कमाई

शेतीतून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळू शकतं, मात्र शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शेती करावी, असं कृषीतज्ज्ञ वारंवार सांगतात. हाच सल्ला देव कुटुंबीयांनी पाळला. त्यांनी खास कृषीतज्ज्ञांशी चर्चा करून विविध सरकारी योजनांची माहिती मिळवली. त्यानंतर आचार्य विद्यासागर गौ संवर्धन योजनेंतर्गत कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. ते बाजारात दूध विक्री करू लागले. त्यातून उरलेल्या दूधाचं ते पनीर बनवतात. पनीर विक्रीतून त्यांना चांगला नफा मिळू लागला. आता तब्बल 12 लाख रुपये इतकं त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे.

advertisement

वय 41 वर्षे, 2 लेकरांची आई, बॉडी अशी की पुरुषालाही लाजवेल; जिममधला Video होतोय व्हायरल

दरम्यान, आचार्य विद्यासागर गौ संवर्धन योजनेच्या लाभार्थ्यांना व्यवसायासाठी तब्बल 10 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जातं. शिवाय बँकेचा व्याज म्हणून सरकार 7 वर्षांपर्यंत 25 हजार रुपये जमा करतं.

मराठी बातम्या/देश/
'या' योजनेमुळे शेतकरी कुटुंब मालामाल; आता वर्षाला 12 लाख झालं उत्पन्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल