वय 41 वर्षे, 2 लेकरांची आई, बॉडी अशी की पुरुषालाही लाजवेल; जिममधला Video होतोय व्हायरल
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
या आईने बॉडी बिल्डिंगमध्ये सुवर्ण भरारी घेतली आहे.
अरशद खान, प्रतिनिधी
देहरादून, 15 ऑगस्ट : आधी करियर मग लग्न, हा विचार सध्या समाजात रुजत असल्याचं आपण पाहतो. मात्र अनेक कर्तृत्ववान मंडळींनी लग्नानंतरही यशस्वी करियर करता येतं, असा आदर्श समाजापुढे निर्माण केला आहे. मेरी कोमसारखे दिग्गज तर संसार आणि मुलं सांभाळून यशस्वी कामगिरी करतात. आता या यादीत आणखी एक नाव जोडलं गेलं आहे, ते म्हणजे प्रतिभा थपलियाल.
advertisement
नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या उत्तराखंडला प्रतिभा थपलियाल यांनी बॉडी बिल्डिंग क्षेत्रात नावलौकिक मिळवून दिला आहे. राष्ट्रीय स्तरावरील वुमेन बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी सुवर्ण पदकदेखील पटकावलं आहे. विशेष म्हणजे प्रतिभा यांचं वय 41 वर्ष आहे. शिवाय त्यांना दोन मुलंसुद्धा आहेत. मात्र असं असतानाही त्यांनी आपल्या करियरकडे दुर्लक्ष केलं नाही, विशेष म्हणजे त्यांनी आपल्या शरीरावर प्रचंड मेहनत घेतली. त्यांचा जिम करतानाच व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
advertisement
https://youtu.be/JkeohZSyoGw
प्रतिभा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये आशियाई चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी चाचणी झाली होती. जबरदस्त बॉडी बिल्डिंग सादरीकरणानंतर या दोन्हीसाठी त्यांची निवड झाली. आता या दोन्ही स्पर्धांमध्ये त्या भारताचं प्रतिनिधित्व करतील. यापैकी पहिली स्पर्धा 1 सप्टेंबरपासून 6 सप्टेंबरपर्यंत काठमांडूमध्ये होईल. तर दुसरी स्पर्धा 6 नोव्हेंबरपासून 12 नोव्हेंबरपर्यंत दक्षिण कोरियात होईल. ज्यात त्या बॉडी बिल्डिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी लढतील.
advertisement
आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, इतक्या तंदुरुस्त दिसणाऱ्या प्रतिभा यांना फार पूर्वी एका मोठ्या आजाराचा सामना करावा लागला होता. त्यांच्या शरीरातली थायरॉईडची पातळी फार वाढली होती. तपासण्यांमधून याबाबत कळताच त्यांनी उपचार घ्यायला सुरुवात केली. कालांतराने थायरॉईडची पातळी सामान्य झाली मात्र त्यांचं वजन तब्बल 60 किलोने वाढलं. आधी कमी वजन असल्यामुळे आता 85 किलो वजनाच्या शरीरासह जगणं त्यांना असह्य झालं होतं.
advertisement
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी व्यायाम सुरू केला. त्या जिमला जाऊ लागल्या. जिम केल्यानंतर त्यांच्या शरीराच्या बांधणीत एक चांगला बदल दिसून आला. त्यांचं वजन कमी झालं नाही, मात्र शरीर आकर्षक दिसू लागलं. तेव्हा त्यांच्या नवऱ्याने त्यांना बॉडी बिल्डिंग करण्याचा सल्ला दिला. प्रतिभा यांनादेखील जिममध्ये व्यायाम करायला आवडायचं. मग त्यांनी नवऱ्याचा सल्ला मनावर घेतला आणि बॉडी बिल्डिंगमध्ये नशीब आजमावून पाहिलं. अर्थात त्यासाठी त्यांनी दिवसरात्र मेहनत केली, व्यायामासह आपल्या आहाराच्या वेळाही बदलल्या. याच मेहनतीचं फळ त्यांना मिळालं आणि आता त्या भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
Location :
Dehradun,Uttarakhand
First Published :
August 15, 2023 11:59 AM IST
मराठी बातम्या/देश/
वय 41 वर्षे, 2 लेकरांची आई, बॉडी अशी की पुरुषालाही लाजवेल; जिममधला Video होतोय व्हायरल