अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानामधून 242 प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती समोर आलीय दरम्यान प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अपघातात आतापर्यंत 130 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटिश आणि 7 पोर्तुगीज होते. विमानात 11 लहान मुले देखील होती.अपघातानंतर अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. असे सांगितले जात आहे की विमान जिथे कोसळले ते मेघानी नगर हे निवासी क्षेत्र आहे आणि अशा परिस्थितीत जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता आहे.
advertisement
काय होता पायलटचा शेवटचा मेसेज?
एअर इंडियांचे हे विमान अहमदाबाद ते लंडन पर्यंत प्रवास करणार होते. दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी या विमानाने उड्डाण केल्यानंतर मेघानी नगर परिसरात कोसळले. ज्यावेळी विमानाने रनवे वरून उड्डाण केल्यानंतर पायलटने 1o मिनिटातच हे विमानाच्या पायलटने एटीसी एक संदेश पाठवला होता. ज्यामध्ये त्याने Mayday Mayday असा संदेश पाठवला होता. याचा अर्थ आम्ही क्रॅश करत आहोत आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. विमान सुरक्षीत लँड करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले असे पायलटने एटीसीला सांगितले. त्यानंकर काही क्षणातच पायलटचा संपर्क तुटला होता.
गृहमंत्री अहमदाबादला रवाना
अहमदाबादमधील विमान दुर्घटनेसंदर्भातली माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय नागरि उड्डाण मंत्र्यांसोबत चर्चा केली. त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासबोत चर्चा करत माहिती घेतली .दरम्यान अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला जलद गतीनं बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर अमित शहा तातडीनं अहमदाबादला रवाना झाले आहेत.