समोर आलेल्या माहितीनुसार, एडीजीपी पुरण कुमार हे रोहतकमधील सुनारिया येथील पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयात सध्या कार्यरत होते. मंगळवारी दुपारी त्यांचा मृतदेह चंदीगडच्या सेक्टर ११ येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी आढळला. घटनेची माहिती मिळताच, चंदीगड पोलिसांचे फॉरेन्सिक पथक आणि सीएफएसएल पथक पोहचले असून सध्या तपास सुरू आहे. २०१० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी पुरण सिंग यांनी त्यांच्या घरात स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती आहे. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली असून त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी जमली आहे .
advertisement
गेल्या दीड वर्षापासून सातत्याने चर्चेत
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वाय. पुरण कुमार यांचा मृतदेह घराच्या बेसमेंटमध्ये आढळला. सर्वप्रथम त्यांच्या मुलीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. त्यानंतर मुलीने तात्काळ पोलिसांना फोन करत याविषय माहिती दिली. पुरण सिंग हे एडीजीपी पदावर होते, परंतु त्यांना आयजी म्हणून बढती देण्यात आली. आयजी वाय पुरण कुमार यांनी गेल्या वर्षी वन ऑफिस वन पॉलिसी या धोरणांतर्गत तक्रार केली होती. त्यांनी आरोप केला होता की, अनेक आयपीएस अधिकाऱ्यांनी एकापेक्षा जास्त सरकारी निवासस्थाने ताब्यात ठेवली होती. शिवाय, त्यांनी माजी डीजीपी आणि अतिरिक्त मुख्य सचिवांविरुद्ध जातीवरून भेदभाव केल्याची तक्रार देखील आयोगाकडे केली होती. गेल्या दीड वर्षापासून सातत्याने चर्चेत होते.
आत्महत्येवेळी पत्नी जपान दौऱ्यावर
अमनीत पी. कुमार या देखील आयएएस अधिकारी आहेत. जपानला जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळात मुख्यमंत्र्यांसोबत होत्या. त्यांचा मृतदेह चंदीगडच्या सेक्टर 11 येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी आढळला. त्यांचा मृतदेह सेक्टर १६ रुग्णालयात नेण्यात आला आहे.
मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सेक्टर 16 मधील रुग्णालयात
या विषयी माहिती देताना एसएसपी कंवरदीप कौर यांनी सांगितले की, त्यांना दुपारी १:३० वाजता गोळीबाराची माहिती मिळाली. सीएफएसएल या टीम तपास करत आहे आणि तपास सुरू आहे. आत्महत्येच्या वेळी घरी उपस्थित असलेल्यांचीही चौकशी केली जात आहे आणि त्यांचे जबाब घेतले जात आहेत.पूरन सिंग यांनी स्वत:वर किती गोळ्या झाडल्या याची माहिती समोर आलेली नाही. मृतदेहाला सेक्टर 16 मधील रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले.