आनंदी संसार! 200 वर्षे जुनी तांबी आणि पितळाची भांडी, पुण्यातील गिरीश यांनी साकारले अनोखे संग्रहालय
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
पुणे हे परंपरा, संस्कृती आणि वारसा जपणारे शहर म्हणून ओळखले जाते. गिरीश पोटफोडे यांनी आपल्या घरातच तांब्या आणि पितळेच्या भांड्यांचे संग्रहालय साकारले आहे.
पुणे: पुणे हे परंपरा, संस्कृती आणि वारसा जपणारे शहर म्हणून ओळखले जाते. कसबा पेठेतील तांबट आळीत राहणाऱ्या गिरीश पोटफोडे यांनी आपल्या घरातच तांब्या आणि पितळेच्या भांड्यांचे संग्रहालय साकारले आहे. सुमारे 200 वर्ष जुन्या आणि 1000 हून अधिक भांड्यांचा संग्रह पुण्याच्या सांस्कृतिक वर्षाला जिवंत ठेवणारा ठरत आहे. याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना गिरीश पोटफोडे यांनी दिली.
पुण्यातील कसबा पेठेतील तांबट आळी ही तांब्याच्या आणि पितळेच्या वस्तू मिळण्यासाठी ओळखली जाते. पितळेच्या आणि तांब्याच्या भांड्यांची कमी झालेली मागणी आणि इतर व्यवसायात वळलेले लोक, यामुळे इथली खासियत असलेली ओळख पुसट होऊ लागली. मात्र आनंदी संसार या नावाने गिरीश पोटफोडे यांनी संग्रहालय उभारून ही परंपरा जिवंत ठेवली आहे.
advertisement
कसबा पेठेत राहणारे गिरीश पोटफोडे हे उच्चशिक्षित असून टाटा मोटर्स मधून सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. मात्र त्वष्टा कासार समाजाची ओळख असलेली तांबट आळीतल्या वस्तूंची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यांनी आपल्या पूर्वजांचा आणि त्वष्टा कासार समाजाची परंपरा जपण्याचे ठरवले. आणि यातूनच त्यांनी आनंदी संसार हे संग्रहालय साकारले.
या संग्रहालयात अनेक भांडी ही 1800 ते 1900 च्या दशकात घडवलेली आहेत. ह्या संग्रहातील काही भांड्यांवर पेशवेकालीन नक्षीकाम कोरलेले असून काहींवर घरगुती शिलालेख आढळतात. गिरीश पोटफोडे यांनी या सर्व भांड्यांची स्वच्छता आणि डागडुजी स्वखर्चातून केली आहे. ह्यातील प्रत्येक भांड्याला क्रमांक आणि माहिती देऊन हे भांडे संग्रहाच्या स्वरूपात सादर केले आहेत.
advertisement
आजीच्या नावावरून आनंदी संसार नाव
गिरीश पोटफोडे यांचे पूर्वज हे तांब्याच्या आणि पितळेच्या वस्तू घडवण्याचे काम करत. त्यातूनच त्यांच्या पूर्वजांनी अनेक वस्तू ह्या जपून ठेवलेल्या होत्या. पोटफोडे यांच्या आजी आनंदी पोटफोडे यांनी ह्या भांड्यांचा संग्रह केला. याच गोष्टीची प्रेरणा घेत या संग्रहालयाचे आनंदी संसार हे नाव ठेवण्यात आले.
दरवर्षी हजारो पर्यटक, स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमी या संग्रहालयाला भेट देतात. गिरीश पोटफोडे यांच्या या प्रयत्नामुळे पारंपरिक वस्तूंचा ठेवा जिवंत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 07, 2025 6:27 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
आनंदी संसार! 200 वर्षे जुनी तांबी आणि पितळाची भांडी, पुण्यातील गिरीश यांनी साकारले अनोखे संग्रहालय