या जोरदार पावसामुळे शहरांमध्ये पाणी साचले असून, काही भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते बंद, घरांमध्ये पाणी शिरणे आणि वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार समोर आले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात अति मुसळधार पाऊस झाला. स्थानिक प्रशासन सतर्क झालं असून, नागरिकांनी घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. गोव्यातील अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृष्यं पाऊस झाला आहे. त्यामुळे रस्त्यांना नदीचं रुप आलं असून अनेक दुचाकी पाण्याखाली गेल्या आहेत.
advertisement
दक्षिण महाराष्ट्रालाही पावसाचा फटका बसणार
या पावसाळी वाऱ्यांचा परिणाम दक्षिण महाराष्ट्रातही दिसणार आहे. हवामान खात्याने सांगितले की, आज सायंकाळपासून कोल्हापूर, सातारा, सांगलीसह दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागांत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गोव्यात जिल्हा प्रशासनाने निचऱ्याच्या भागांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. काही शाळा आणि महाविद्यालयांना तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. अरबी समुद्रात वाऱ्याचा वेग वाढत असल्याने मच्छीमारांना पुढील दोन दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. किनारपट्टीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.