आग्रा, 28 डिसेंबर : फुलांचं सौंदर्य, त्यांचा सुगंध आपल्याला कितीही आवडत असला तरी कोमेजल्यानंतर ती फेकावी लागतात. परंतु एका तरुणाने चक्क कोमेजलेल्या फुलांपासून अगरबत्ती तयार केली आहे. फुलं कोमेजल्यानंतरही सुगंध देतात हे यातून दिसून येतंय.
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील या तरुणाने अत्यंत मनमोहक अशा सुगंधाची अगरबत्ती तयार केलीये. अमरीश शर्मा असं या तरुणाचं नाव. त्याने बनवलेल्या अगरबत्तीला लोकांची विशेष पसंती मिळतेय. त्यामुळे या अगरबत्तीची विक्री मोठ्या प्रमाणात होतेय.
advertisement
चेहऱ्यावर अगदी चंद्रासारखं तेज येईल, वजनही कमी होईल; उपाय घरातच!
अमरीश सांगतो, 'मी एका पुस्तकात वाचलं होतं की, फुलं म्हणतात, आम्हाला वाटेवर सोडून द्या किंवा देवावर वाहा, असं सुंदर वर्णन मी वाचलं. परंतु फुलं कोमेजतात त्यामुळे जोपर्यंत ती टवटवीत असतात तोपर्यंतच त्यांचा वापर वेगवेगळ्या उत्सवांमध्ये होतो. त्यानंतर ती फेकावीच लागतात. याचंच मला वाईट वाटतं म्हणून मी फुलं सुकवून त्यांची पावडर बनवतो आणि त्या पावडरपासून अगरबत्ती तयार करतो. या अगरबत्तीचा वापर आपण पूजेसाठी करू शकता.
तेज नाहीच, वाढतोय रखरखीतपणा; थंडीत त्वचेची काळजी घ्यावी तरी कशी?
घरात सुगंधित वातावरण राहावं यासाठीदेखील आपण या अगरबत्ती वापरू शकता. विशेष म्हणजे या अगरबत्तीत फुलांसह गायीच्या शेणाचाही वापर केलेला असतो. शिवाय सुरेख वास यावा यासाठी यात परफ्युम वापरलं जातं. ग्राहकांना हव्या ता वासाची अगरबत्ती मिळते.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g