अमित शहा यांची काँग्रेसवर टीका
काल माजी गृहमंत्री चिदंबरमजींनी प्रश्न उपस्थित केला होता. दहशतवादी पाकिस्तानातून आले याचा पुरावा काय आहे? मी त्यांना विचारू इच्छितो की पाकिस्तानला वाचवून त्यांना काय मिळेल. जेव्हा ते असे म्हणतात, तेव्हा याचा अर्थ ते पाकिस्तानला क्लीन चिट देत आहेत, असं म्हणत अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका केली.
advertisement
पाकिस्तानचा बुरखा फाडला
एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना आधीच अटक केली होती. त्यांना जेवू घालणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. दहशतवाद्यांचे मृतदेह श्रीनगरमध्ये पोहोचले तेव्हा पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणारे ते तिघे जण असल्याचे त्यांना आढळले. दहशतवादी हल्ल्यातील काडतुसेचा एफएसएल अहवाल आधीच तयार होता. काल, तिन्ही दहशतवाद्यांच्या रायफल जप्त करण्यात आल्या आणि एफएसएल अहवालांशी जुळवण्यात आल्या. काल चंदीगडमध्ये पुढील चाचण्या करण्यात आल्या, त्यानंतर हे तिघंही दहशतवादी हल्ला करणारेच असल्याची पुष्टी झाली, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.