कुटुंबाने स्थानिक पोलिसांना कळवलं अन्...
सोनम रघुवंशी नंदगंजमधील एका ढाब्यावर आढळली. प्रथम तिने तिच्या कुटुंबाला सांगितलं. कुटुंबाने स्थानिक पोलिसांना कळवलं, असं पोलिस अधीक्षक डॉ. इराज राजा यांनी सांगितलं आहे. तेथील पोलिसांनी आम्हाला कळवलं. त्यानंतर सोनमला नंदगंज ढाब्यावरून आणून वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आले. सध्या चौकशीसोबतच चौकशी सुरू आहे, असं पोलिस अधीक्षक डॉ. इराज राजा यांनी सांगितलं आहे. मात्र, सोमन स्वत: पोलिसांकडे गेली, असं सोनमच्या वडिलांनी म्हटलं आहे.
advertisement
सोनमचा भाऊ गोविंदला फोन
सोनमने त्याचा भाऊ गोविंदला फोन केला, ज्याने मला सांगितले की सोनम गाजीपूरमधील एका ढाब्यावर सापडली आहे. सरकारला माझी विनंती आहे की सीबीआय चौकशी करावी. मेघालय पोलिस खोटे बोलत आहेत. त्यांनी कोणतीही चौकशी केली नाही. राजा रघुवंशीच्या हत्येत मेघालय पोलिसांचा सहभाग आहे याची मला १००% खात्री आहे. मी राजा रघुवंशीच्या कुटुंबाशी बोललो नाही. लग्नापूर्वी सोनम आणि राजा एकमेकांना ओळखत नव्हते, असं सोनमच्या वडिलांनी म्हटलं आहे.
सोमनच्या वैद्यकीय तपासण्या
दरम्यान, सोनम सध्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या सुरक्षित ताब्यात असून तिच्या वैद्यकीय तपासण्या आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले जात आहे. मेघालय पोलिसांच्या विशेष तपास पथकाने SDRF, NDRF आणि देशभरातील विविध यंत्रणांच्या सहकार्याने हे यश मिळवलं आहे. पोलीस अधीक्षक डॉ. एस.आर. मराक यांनी ही अधिकृत माहिती दिली असून न्यायाच्या प्रक्रियेसोबत सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.