खरंतर, शनिवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा निर्णय झाला. यानंतर काही वेळातच इम्रान खान हे नाव सोशल मीडिया आणि गुगलवर ट्रेंड करू लागले. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरल्या. ज्यामुळे पाकिस्तानमध्ये भीती, राग आणि गोंधळ निर्माण झाला. माजी पंतप्रधानांचा तुरुंगात मृत्यू झाल्याने जगालाही याचा धक्का बसला. इम्रान खान यांचे समर्थकही पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले.
advertisement
प्रेस रिलीजमध्ये नक्की काय म्हटलं?
१० मे रोजी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेलं एक कथित प्रेस रिलीज व्हायरल झालं. त्यात लिहिले होतं की, 'पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूची आम्ही अत्यंत खेदाने आणि गांभीर्याने पुष्टी करतो.' ही घटना अशा परिस्थितीत घडली ज्याची सध्या सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे देशभरात आणि त्यापलीकडे संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तान सरकार या परिस्थितीचे गांभीर्य मान्य करते. या दुःखद घटनेमागील कारणे आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी आम्ही पूर्ण पारदर्शकपणे याचा तपास करतो. पाकिस्तानात नेहमीच कायद्याचे राज्य आहे. या कठीण काळात देशाला शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
व्हायरल प्रेस रिलीजचं तथ्य काय?
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी केलेल्या कथित पत्रात इम्रान खान यांच्या मृत्यूचा दावा केला जात असला तरी या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नव्हते. इम्रान खानच्या मृत्यूचा दावा खोटा आहे. इम्रान खान जिवंत आहेत, याची पुष्टी पाकिस्तान ऑब्झर्व्हर आणि हिंदुस्तान हेराल्डसह अनेक वृत्तवाहिन्यांनी केली आहे. सध्यस्थितीत इम्रान खान हे आदियाला तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेले कथित प्रेस रिलीज खोटे आहे. असं कोणतंही पत्रक अधिकृत चॅनेलवर जारी केलं नव्हतं.