भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान भारताच्या ब्रह्मोस मिसाइलची जगभरात चर्चा झाली. ब्रह्मोसने कशा प्रकारे पाकिस्तानच्या रडारला चकवा देत एअर बेस उद्धवस्त केले हे अवघ्या जगानं पाहिलंय. ब्रम्होसनं पाकिस्तानच्या बरबादीची कहाणी लिहिली आहे. त्यामुळेचं अवघ्या 86 तासांत पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकले.आजवर कोणत्याच मिसाईलनं जे केलं नाही ते ब्रह्मोस मिसाइलने करुन दाखवलं आहे.
लष्करी ठिकाणांवर अचूक हल्ले
advertisement
ब्रह्मोसच्या निर्मितीनंतर तब्बल 14 वर्षांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये या मिसाईलचा वापर केला गेला. भारतीय हवाई दलाने Sukhoi Su-30MKI विमानावरून ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागून पाकिस्तानमधील महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर अचूक हल्ले केले. पाकिस्तानचा कर्दनकाळ ठरलेल्या ब्रम्होसची कहाणी मोठी रंजक आहे.
भारत आणि रशियात एक करार
1980 च्या दशकात भारतानं स्वदेशी क्षेपणास्त्र तंत्रज्ञानासाठी ‘इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम सुरू केला. 1991 च्या आखाती युद्धात क्रूझ क्षेपणास्त्रांच्या यशस्वी वापरामुळे भारतानं मिसाईल निर्मितीवर लक्ष केंद्रीत केलं. फेब्रुवारी 1998 मध्ये भारत आणि रशियात एक करार झाला. .या करारातून ब्रह्मोस एरोस्पेस या संयुक्त उपक्रमाची स्थापना झाली.
ब्रम्होसची कहाणी काय?
ब्रह्मोस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रकल्पाचं फळ आहे, ज्याची निर्मिती 1998 मध्ये सुरू झाली.या क्षेपणास्त्रां नाव ब्रह्मपुत्रा आणि मॉस्क्वो नद्यांवरुन ठेवण्यात आलंय. भारत आणि रशियातील मैत्रीचं ते प्रतीक आहे. 12 जून 2001 मध्ये ओडिशातील चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज वरून, ब्रह्मोसची पहिली यशस्वी चाचणी करण्यात आली.. तेव्हापासून ब्रह्मोसने जागतिक स्तरावर एक विश्वसनीय व अत्यंत वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र प्रणाली म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. हे मिसाईल जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल आहे, जे ध्वनीच्या 3 पट वेगानं लक्ष्य भेदतं. जमीन, समुद्र, हवा आणि पाणबुडीवरून लाँच करता येणारं हे मिसाईल खऱ्या अर्थानं 'ब्रह्मास्त्र' आहे. शत्रूच्या रडारला चकवा देऊन लक्ष्याचा खात्मा करते. ऑपरेशन सिन्दूरमध्ये पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टमलाही ब्रह्मोसने धोबीपछाड दिलीय..
भारताच्या क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांच्या विकासात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या डॉ. अब्दुल कलाम यांच्या संशोधनामुळे हे मिसाईल सत्यात उतरलं. मिसाईल मॅन कलाम यांच्या योगदानामुळेच आज भारताच्या हाती ब्रह्मास्त्र आहे.