TRENDING:

नागरी वस्ती, शाळा आणि हॉस्पिटलवर हल्ले, हवाई अड्ड्यांनाही टार्गेट, सोफिया कुरेशी यांचा पाकला शेवटचा इशारा

Last Updated:

India Pakistan Tension: शुक्रवारी मध्यरात्री देखील पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात भारतीय ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. याबाबतची माहिती भारतीय सैन्यदलाने पत्रकार परिषदेत दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिल्ली: भारत-पाकिस्तान संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या चौथ्या दिवशी देखील दोन्ही देशातला संघर्ष थांबला नाही. पाकिस्तानकडून सातत्याने हल्ले केले जात आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांना भारताकडून जशास तसे उत्तर दिलं जात आहे. शुक्रवारी मध्यरात्री देखील पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात भारतीय ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. याबाबतची माहिती भारतीय सैन्यदलाने पत्रकार परिषद घेत दिली.
News18
News18
advertisement

भारताच्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी सीमारेषेवर सुरू असलेल्या कारवायांची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की, शुक्रवारी मध्यरात्री पाकिस्तानकडून भारताच्या २६ ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. उधमपूर, पठाणकोठ, आदमपूर, भूज आणि बठिंडा येथील भारताच्या हवाई तळाला पाकिस्तानने हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तसेच श्रीनगर, अवंतीपूर, उधमपूर येथील हवाई दलाच्या तळावरील दवाखाने, शाळा आणि नागरी वस्तीवर देखील पाकिस्तानने भ्याड हल्ला केला.

advertisement

एलओसीवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरू आहे. श्रीनगर, नलीयासह 26 ठिकाणांवर पाकिस्तानकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र भारतीय सैन्यदलाने हे हल्ले परतून लावले आहेत. पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून सतत हल्ले केले जातायत. त्याचबरोबर पाकिस्तानकडून अनेक चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय.

पाकिस्तानकडून कुपवाडा, बारामुल्ला, अखनूर, पुंछ सेक्टरमध्ये भीषण गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानकडून भारतीय सैन्याच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय. याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने UAV फायटर जेटने पाकिस्तानवर हल्ला केला. यात पाकिस्तीनी सैन्याचे लाँच पॅड आणि चार एअरबेस उद्ध्वस्त करण्यात आले, अशी माहिती सोफिया कुरेशी यांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/देश/
नागरी वस्ती, शाळा आणि हॉस्पिटलवर हल्ले, हवाई अड्ड्यांनाही टार्गेट, सोफिया कुरेशी यांचा पाकला शेवटचा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल