भारताच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणात मोठी टर्निंग घेत, मोदी सरकारने अवघ्या 24 तासांत दोन निर्णायक निर्णय घेतले आहेत. चीनच्या भारतविरोधी प्रचाराला प्रत्युत्तर म्हणून केंद्र सरकारने चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर बंदी घातली आहे. तर, दुसरीकडे
अमेरिकेच्या टॅरिफ वाढीला थेट प्रत्युत्तर देत भारतानेही महत्त्वाच्या उत्पादनांवर आयातशुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या दुहेरी आक्रमक पावलांनी जागतिक राजकारणात भारताच्या ठोस निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
चीनवर डिजीटल स्ट्राइक....
सरकारने बुधवारी चीन सरकारचे वृत्तपत्र, वृत्तवाहिनी 'ग्लोबल टाईम्स' आणि 'शिन्हुआ'च्या एक्स अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली आहे. चीनच्या मुखपत्रातून सतत पसरवल्या जाणाऱ्या प्रचारामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर या अकाउंटवरून भारतीय सैन्याबद्दल खोटे वृत्त आणि खोटे दावे पसरवण्यात आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. ही कारवाई करण्याआधी भारताने चीनच्या अधिकाऱ्यांकडे या फेक न्यूजबाबत नाराजी व्यक्त करत कारवाईचा इशारा दिला होता.
अमेरिकेलाही दणका, टॅरीफवर रोखठोक भूमिका
भारताने अमेरिकेलाही दणका दिला आहे. अमेरिकेने जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) नियमांचे उल्लंघन करून भारतातून जाणाऱ्या स्टीलवर 25% आणि ॲल्युमिनियमवर 10% शुल्क लावले आहे. आता भारतानेही अमेरिकेला त्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारताने अमेरिकेतून येणाऱ्या 29 वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लावण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. भारताने प्रस्तावित केलेल्या 29 उत्पादनांमध्ये सफरचंद, बदाम, नाशपाती, अँटी-फ्रीजिंग उत्पादने, बोरिक ॲसिड आणि लोखंड-स्टीलपासून बनवलेल्या काही वस्तूंचा समावेश आहे.