सोनमचे नोकरासोबत प्रेमसंबंध
सोनम आणि राज एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखत होते. दोघेही सातत्याने फोनवरून संपर्कात होते. त्यांच्यात तासनतास बोलणं व्हायचं. पोलिसांनी सोनमचा फोन ट्रेस केला. कॉल डिटेल्समध्ये सोनम आणि राज यांच्यातील संबंध उघड झाले आहेत. सोनमचा प्लायवूडचा व्यवसाय होता. इथं राज हा बिलिंग एजंट म्हणून काम करायचा. याच दरम्यान दोघांची ओळख झाली. कालांतराने दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. राज हा सोनमपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे.
advertisement
लग्नानंतर सहाव्या दिवशी रचला हत्येचा कट
सोनमचं राजा रघुवंशीसोबत लग्न झाल्यानंतर अवघ्या सहाच दिवसात सोनमने राजला हाताशी धरून राजाच्या हत्येचा कट रचला. राज हाच या हत्याकांडाचा मास्टरमाइंड आहे. सोनमसोबत प्लॅन झाल्यानंतर राजने आपला मित्र विशाल सिंग, आनंद कुर्मी, आकाश राजपूत यांनाही कटात सहभागी करून घेतली. प्लॅननुसार त्यांना गुवाहाटीला पाठवले. ज्यावेळी राजा आणि सोनम हनिमूनसाठी शिलाँगला पोहोचले. तेव्हा विशाल, आनंद आणि आकाश हे तिघेही तिथे पोहोचले. संधी साधून तिघांनी प्लॅन करून राजाची हत्या केली. सोनम स्वत: राजला हत्येच्या ठिकाणी घेऊन गेली होती.
मध्य प्रदेशातून सोनमच्या साथीदारांना अटक
राजा रघुवंशी हत्याकांडात आकाश नावाच्या तरुणाला ललितपूर येथून अटक करण्यात आली होती. आकाश हा देखील या प्रकरणात आरोपी आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की आरोपी आनंद हा उत्तर प्रदेशातील ललितपूरजवळील चौकी गावातील रहिवासी आहे. रविवारी रात्री उशिरा मेघालय पोलिसांनी सागर येथून आरोपी आनंदला अटक केली.
माझी मुलगी निर्दोष- सोनमच्या वडिलांची प्रतिक्रिया
सोनम रघुवंशीचे वडील देवी सिंह यांनी म्हटले आहे की त्यांची मुलगी सोनम निर्दोष आहे. एवढेच नाही तर त्यांनी मेघालय पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणतात की, हे लग्न दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने झालं. मेघालय सरकार पहिल्या दिवसापासून खोटे बोलत आहे. माझी मुलगी काल रात्री गाजीपूरमधील एका ढाब्यावर आली आणि तिच्या भावाला फोन केला. पोलिस ढाब्यावर गेले आणि तिथून तिला घेऊन गेले. मी माझ्या मुलीशी बोलू शकलो नाही. माझी मुलगी असे का करेल, तिच्या पतीला का मारेल? मेघालय पोलिस पूर्णपणे खोटे बोलत आहेत. मी गृहमंत्री अमित शहा यांना सीबीआय चौकशीची विनंती करतो. माझी मुलगी १०० टक्के निर्दोष आहे.