खरं तर, राजाला सोनमशी लग्न करायचं नव्हतं. लग्नाच्या आधीच त्याला सोनमचा खरा रंग समजला होता. याबाबतची हिंट त्याने आपल्या आईला देखील दिली होती. पण आईने मध्यस्थी केल्यानंतर दोघांचा विवाह झाला. पण तेव्हाच राजाने लग्नास नकार दिला असता, तर कदाचित आज राजा रघुवंशी जीवंत असता, याबाबतची प्रतिक्रिया राजाच्या आईनं दिली आहे. लग्नाआधी काय घडलं? याचा खुलासाही त्यांनी केली.
advertisement
राजाला सोनमशी लग्न नव्हतं करायचं
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नापूर्वीच राजाला समजलं होतं की, सोनम त्याच्याशी लग्न करण्यात इच्छुक नाहीये. त्याने आपल्या आईलाही याबाबत सांगितलं होतं. सोनम त्याच्यात काहीच इंटरेस्ट दाखवत नाही. त्यामुळे तो सोनमसोबत लग्न करू इच्छित नाही, असं त्याने आईला सांगितलं होतं. यानंतर राजाच्या आईने सोनमशी याबद्दल विचारला केली. यावर आपण ऑफिसच्या कामात बिझी होतो, असं सोनमने राजाच्या आईला सांगितलं. आईने हस्तक्षेप केल्यानंतर सोनमने राजाशी बोलायला सुरुवात केली. दोघांचे लग्न १ ऑक्टोबर २०२४ रोजी मॅचमेकिंग बुकलेटद्वारे निश्चित झालं.
हनिमूनची तिकीटं सोनमने बूक केली
राजाची आई उमा रघुवंशी यांनी पुढे सांगितलं की, हनिमूनसाठी शिलाँगला जाण्याचा प्लॅनही राजाचा नव्हता. सोनमला सुट्टीसाठी जायचे होते पण राजाने नकार दिला. पण सोनमने आधीच तिकीट बूक केले. त्यामुळे राजाही तिच्यासोबत गेला. ही ६ ते ७ दिवसांची ट्रिप होती. विशेष म्हणजे सोनमने फक्त जाण्याची तिकीटं बूक केली होती. परत येण्याची तिकीटं बूक केली नव्हती. त्यामुळे आता राजाला हनिमूनसाठी शिलाँगला घेऊन जाणं हा एक कटाचा भाग होता का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.