TRENDING:

राजा रघुवंशीसोबत महिलेचाही होणार होता मर्डर, सोनमचा प्लॅन अर्धवट, बुरखा कांड ऐकून पोलीस चक्रावले

Last Updated:

Raja Raghuwanshi Case: इंदूर येथील व्यावसायिक राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. आरोपींनी राजा रघुवंशीसोबत एका महिलेचा मर्डर प्लॅन केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Raja Raghuwanshi Murder Case: मेघालयातील शिलाँग येथे हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरच्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी पत्नी सोनम, कथित प्रियकर राज आणि त्याच्या ३ साथीदारांना अटक करण्यात आली आहे. शिलाँग पोलिसांनी बुधवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलं. यावेळी कोर्टानं सर्वांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. चौकशीदरम्यान सोनमने आपला गुन्हा कबुल केल्याचे सांगण्यात येत आहे. पाचही आरोपींना अटक केल्यानंतर राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात नवनवीन माहिती उजेडात येत आहे.
News18
News18
advertisement

नेमका प्लॅन काय होता?

आरोपी सोनमने प्रियकर राजशी संगनमत करत पती राजासह एका महिलेच्या मर्डरचा देखील प्लॅन केला होता. याबाबतची खळबळजनक माहिती शिलाँग पोलिसांनी दिली. राजासोबत सोनमचा देखील मृत्यू झाला, हे भासवण्यासाठी सोनमने एका महिलेचाही खून करायची योजना आखली होती. मात्र ऐनवेळी त्यांचा प्लॅन अर्धवट राहिला. या प्लॅनचा भाग म्हणून राजने आधीच आरोपींसोबत सोनमसाठी एक बुरखा पाठवला होता.

advertisement

महिलेच्या मर्डरमागे आरोपींचा हेतू काय होता?

शिलाँग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाची हत्या केल्यानंतर एखाद्या महिलेला मारून तिला स्कूटीसह जाळण्याची किंवा नदीत फेकून देण्याची योजना आरोपींची होती. जेणेकरून राजासोबत अज्ञातांनी सोनमलाही मारलं, असं भासवता आलं असतं. या कटाचा भाग म्हणून आरोपी राजने इंदूरहून आरोपीला एक मोबाईल, ५० हजार रुपये आणि सोनमसाठी काळा बुरखा पाठवून दिला होता, असंही तपासात उघड झालं आहे.

advertisement

...अन् बुरखा घालून सोनम पळाली

मारेकरी विशालने हा बुरखा सोनमसाठी शिलाँगला नेला होता. राजाचा खून केल्यानंतर आरोपींनी त्याच परिसरात अ‍ॅक्टिव्हा टाकून दिली होती. यानंतर किलर सोनम हाच बुरखा घालून टॅक्सीने सिलिगुडीला पळून गेली. हत्येच्या या घटनेनंतर १७ दिवसांनी पोलिसांनी सोनमला उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधून अटक केली. प्रियकर राजसोबतच सोनम गाझीपूरला आली होती. राजने गाझीपूरमध्ये आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीकडे सोनमला ठेवलं होतं. पण याची माहिती मिळताच पोलिसांनी तिची उचलबांगडी केली. तसेच आरोपी राजसह इतर आरोपींना देखील पोलिसांनी अटक केली. सर्व आरोपी सध्या शिलाँग पोलिसांच्या ताब्यात आहेत.

advertisement

मराठी बातम्या/देश/
राजा रघुवंशीसोबत महिलेचाही होणार होता मर्डर, सोनमचा प्लॅन अर्धवट, बुरखा कांड ऐकून पोलीस चक्रावले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल