पाटणा : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) ने बिहार विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे एक दिवस आधी पक्षाने स्वबळावर सहा जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीचा घटक असलेल्या JMM ने आता या बदललेल्या भूमिकेचं कारण स्पष्ट करताना काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (RJD) वर “राजकीय कटकारस्थान” रचल्याचा आरोप केला आहे.
advertisement
JMM ने म्हटलं आहे की काँग्रेस आणि राजद या दोन पक्षांनी मिळून बिहारमध्ये त्यांना जागा नाकारल्या, तर हेच दोन्ही पक्ष झारखंडमध्ये सोरेन सरकारचे भागीदार आहेत.
‘राजकीय कट’ – JMM आघाडीवर पुनर्विचार करणार
JMM चे वरिष्ठ नेते आणि झारखंडचे पर्यटन मंत्री सुदिव्य कुमार यांनी सांगितले की- पक्ष झारखंडमधील काँग्रेस आणि राजद यांच्याशी असलेल्या आघाडीवर पुन्हा विचार करणार आहे आणि या अपमानाला योग्य उत्तर दिले जाईल. RJD आणि काँग्रेस यांनी JMM ला निवडणुकीतून बाहेर ठेवण्यासाठी राजकीय कट रचला आहे. JMM त्याला योग्य प्रत्युत्तर देईल आणि या आघाडीचा पुनर्विचार करेल, असे कुमार म्हणाले.
सहा जागांची घोषणा आणि मग माघार
गेल्या आठवड्याच्या शेवटी JMM ने बिहारमधील चकाई, धमदहा, कतोरीया, मनीहारी, जमुई आणि पीरपैंती या सहा जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र काँग्रेस आणि राजद यांच्यात जागा वाटपावर एकमत न झाल्याने त्यांनी स्वतःचे उमेदवार उभे करायला सुरुवात केली. ज्यामुळे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता निर्माण झाली.
त्याच पार्श्वभूमीवर आता JMM ने माघार घेतली असून यामुळे INDIA आघाडीतल्या मतभेद आणखी समोर आले आहेत.