हल्ला झाल्यानंतर काही वेळातच सिंदी कॉलनी आणि आसपासच्या परिसरातील बाजार लोकांनी बंद केला तसेच रास्तारोको देकील केला. आता हे भांडण इंदूर २ विरुद्ध इंदूर ४ अशी झाली आहे. कारण इंदूर ४ चे आमदार मालिनी गौड हे कालरा यांचे तर इंदूर २ चे आमदार रमेश मेंदोला हे यादव यांच्या जवळचे आहेत.
advertisement
रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना; छत कोसळून 35 ते 40 कामगार अडकले
५० जणांनी केला हल्ला
कालरा यांनी केलेल्या दाव्यानुसार महापालिकेतीलस एक अधिकारी यतीन्द्र यादव यांच्याशी त्यांचा वाद झाला होता. त्यांनी मला जीतू यादव यांचे नाव सांगत धमकी दिली. त्यावर मी म्हटले की जीतू यादव तोफ आहेत का? या घटनेच्या १० दिवसांनी (३ जानेवारी) अधिकाऱ्याने ऑडिओ व्हायरल केला. शुक्रवारी रात्री जीतू यादव यांचा फोन आला आणि त्यांनी मला धमकी दिली. शनिवारी रात्री ५० ते ६० जणांच्या जमावाने माझ्या घरावर हल्ला केला. माझी आई, पत्नी आणि मुलाला मारले. मुलाला नग्न करून मारहाण करण्यात आली. माझ्या मुलाच्या पोटाला आणि पाठीवर चाकू लागला आहे. याचा व्हिडिओ देखील करण्यात आला. यादव यांनी फोनवर म्हटले होते की, आता रोज हल्ले होतील. तू माझे नाव कसे घेतलेस, माझी बदनामी का केली.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार ४२ दिवसांची स्पेशल सुट्टी, अशा आहेत अटी
कशामुळे सुरु झाला वाद
झोन १२ अंतर्गत बेकायदेशीर इमारतीचे बांधकाम थांबवण्यासाठी यतीन्द्र यादव यांनी नोटीस दिली होती. यावर नगरसेवक कालरा यांनी यतीन्द्र यांना धमकी दिली होती. यावर विभागीय अधिकारी राहुल सूर्यवंधी यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी कालरा आणि यतीन्द्र यांचे फोनवर बोलणे करून दिले होते. दरम्यान कालरा यांनी यादव आणि यतीन्द्र यांच्याबद्दल अपशब्द वापरले.
या सर्व घटनेनंतर नगरसेवक कालरा यांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी प्रदेश अध्यक्षांची भेट घेण्यास सांगितले. कालरा यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ दाखवला.
फिल्डरचा प्रताप पाहून संघातील खेळाडूंवर तोंड लपवण्याची वेळ, Video
कालरा यांच्याविरोधात यतीन्द्र यादव यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. तर कालरा यांनी घरावर झालेला हल्ला आणि तोडफोड प्रकरणी तक्रार दिली आहे. जीतू यादव यांनी सर्व आरोप फेटाळून लावत कालरा यांचा ऑडिओ व्हायरल झाला होता ज्यात ते शिवीगाळ करत आहेत. आता स्वत:ची प्रतिमा चांगली करण्यासाठी माझ्यावर आरोप करत आहेत.
मध्य प्रदेशमधील या दोन नगरसेवकांमधील हा वाद इतका वाढला आहे की आता हे प्रकरण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचले आहे. यामुळे पक्षाची प्रतिमा खराब होत असून आता मोदींकडून काय आदेश येतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.