रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना; छत कोसळून ३५ ते ४० कामगार अडकले

Last Updated:

Kannauj Railway Station: उत्तर प्रदेशच्या कन्नोज येथे रेल्वे स्टेशनजवळ एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला.या दुर्घटनेत 40 कामगार ढिगाऱ्या खाली अडकले असण्याची शक्यता आहे.

News18
News18
कन्नौज: उत्तर प्रदेशच्या कन्नौज (Kannauj Incident) येथे मोठी दुर्घटना घडली आहे. रेल्वे स्टेशनजवळ एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला. या घटनेत अनेक कामगार अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. हाती आलेल्या माहितीनुसार दुर्घटना घडली तेव्हा 40 पेक्षा जास्त कामगार काम करत होते.  हे सर्व कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. त्यापैकी काहींना बाहेर काढण्यात आले आहे. पोलिस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेत अधिकाऱ्यांना बचावकार्य आणि सर्वतोपरी मदतीचे निर्देश दिले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, दुर्घटनेच्या वेळी तो जेवणासाठी गेला होता. त्याच्या म्हणण्यानुसार, 40 ते 50 कामगार काम करत होते. सध्या 11 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
फिल्डरचा प्रताप पाहून संघातील खेळाडूंवर तोंड लपवण्याची वेळ, Video
advertisement
कन्नौज रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या सौंदर्यीकरणाच्या कामादरम्यान ही दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीचा लेंटर अचानक कोसळला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि मदतकार्य पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात पाठवले जात आहे.
45व्या वर्षी प्रभास लग्न करणार? कोण आहे ती भाग्यशाली व्यक्ती
स्लॅब कोसळल्यामुळे जोरदार आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला.  प्रशासनाने या दुर्घटनेच्या कारणांची चौकशीचे आदेश दिले आहेत.
advertisement
समाज कल्याण राज्यमंत्री आणि कन्नौजचे आमदार असीम अरुण यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 23 कामगारांना वाचवण्यात आले आहे. यापैकी २० जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. ३ जखमींना  उपचारांसाठी लखनौला पाठवण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना; छत कोसळून ३५ ते ४० कामगार अडकले
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement