45व्या वर्षी प्रभास लग्न करणार? कोण आहे ती भाग्यशाली व्यक्ती, एका पोस्टमुळे सुरू झाली चर्चा

Last Updated:

Telugu star Prabhas: तेलुगू सुपरस्टार अभिनेता प्रभास लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. ही चर्चा खरी आहे का याबद्दल अद्याप समजू शकले नाही.

News18
News18
मुंबई: तेलुगू सुपरस्टार आणि बाहुबली फेम अभिनेता प्रभास लग्नाच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसात प्रभास त्याच्या नव्या प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. अशात आता तो 45व्या वर्षी लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू होण्याचे कारण म्हणजे ट्रेड एनालिस्ट मनोबाला विजयबालन यांनी एक्सवर शेअर केलेली पोस्ट होय.
विजयबालन यांच्या पोस्टमध्ये फक्त 'प्रभास' इतकेच लिहले आहे आणि त्याच्यापुढे लग्न आणि पांढऱ्या वधूचा इमोजी जोडला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असे काहीच म्हटले नाही की, प्रभास लग्न करणार आहे की नाही. पण ही पोस्ट चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे.
Video: कॅच सोडला तरी अंपायरने आऊट दिले; नॉन स्ट्रायकर फलंदाजाचा मूर्खपणा पाहा
आश्चर्य वाटू लागले आहे की प्रभास लवकरच लग्न करणार का? या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने विचारले, "ही बातमी खरी आहे का? दुसऱ्या एका युजरने लिहिले, शेवटी! अभिनंदन प्रभास सर. तिसऱ्या एका व्यक्तीने विचारले, प्रभास लग्न करणार आहे का? काही युजर्सनी या भाग्यशाली व्यक्तीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली आणि प्रभास त्यांची बाहुबली सहकलाकार अनुष्का शेट्टीसोबत लग्न करणार असल्याचे अंदाज लावले.
advertisement
गेल्या वर्षीही प्रभासच्या लग्नाच्या अफवा सोशल मीडियावर जोरात पसरल्या होत्या, जेव्हा त्यांनी सोशल मीडियावर ‘कोणीतरी खास’ असल्याचा संकेत देणारी पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर प्रभासने हैदराबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान लग्नाच्या या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आणि त्या अफवा फेटाळून लावल्या. ते म्हणाले, मी लवकरच लग्न करणार नाही, कारण माझ्या महिला चाहत्यांच्या भावना दुखावू इच्छित नाही.
advertisement
कृती सेननच्या डेटिंगच्या अफवा
2023 मध्ये प्रभास कृती सेननसोबत डेटिंग करत असल्याच्या चर्चाही पसरल्या होत्या. वरुण धवनने 'झलक दिखला जा' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये म्हटले होते की, कृती सेननचे नाव दुसऱ्याच्या हृदयावर लिहिले आहे. मात्र कृतीने नंतर एक निवेदन देऊन या अफवा फेटाळून लावल्या होत्या.
मराठी बातम्या/मनोरंजन/
45व्या वर्षी प्रभास लग्न करणार? कोण आहे ती भाग्यशाली व्यक्ती, एका पोस्टमुळे सुरू झाली चर्चा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement