उत्तराखंडमधील केदारनाथ इथे फादर्स डेच्या दिवशी म्हणजेच 15 जून रोजी हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये पायलट रिटायर लेफ्टिनेंट कर्नल राजवीर सिंह चौहान यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच चौहान कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. रिटायर लेफ्टिनेंट कर्नल राजवीर सिंह यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहे.
रिटायर लेफ्टिनेंट कर्नल राजवीर सिंह यांची पत्नी लेफ्टिनेंट कर्नल दीपिका चौहान अंगावर वर्दी डोळ्यात पाणी आणि हातात फोटो घेऊन अंत्ययात्रेत सहभागी झाल्या होत्या. पतीला शेवटचा निरोप देताना त्यांनी जे केलं ते पाहून कुटुंबीय, नातेवाईकांचाही धीर सुटला. पाणावलेल्या डोळ्यांनी सगळ्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.
advertisement
लेफ्टनंट कर्नल राजवीर यांना अंतिम निरोप देण्यासाठी राजस्थानचे मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड हे देखील अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. अंत्ययात्रेतलं हे दश्यं मन हेलावून टाकणारं आहे. लेफ्टनंट कर्नल दीपिका चौहान यांनी अंगावर युनिफॉर्म घालून आपल्या पतीला अखेरचा निरोप दिला आहे.