९ सुईचा तो मास्टरप्लॅन
न्यूरो सर्जरी विभागाचे डॉ. अंकुर बजाज यांनी सांगितले की, लक्ष्मीला १७ डिसेंबर रोजी गंभीर अवस्थेत आणले होते. तपासणीत असं दिसलं की, गोळी मेंदूत 'मूव्हिंग' स्थितीत आहे. अशा वेळी शस्त्रक्रिया करणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं होतं. डॉक्टरांनी एक अनोखी युक्ती लढवली; त्यांनी मुलीच्या डोक्यात एकाच वेळी ९ सुई टाकून त्या गोळीची हालचाल रोखून धरली. त्यानंतर सलग साडेचार तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर ती गोळी यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आली.
advertisement
अवघ्या ४० हजारांत मिळालं नवजीवन
लक्ष्मीचे कुटुंब अत्यंत गरीब आहे. इतक्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. मात्र, डॉक्टरांनी एनजीओची मदत घेतली आणि अवघ्या ४० हजार रुपयांत हे उपचार पूर्ण झाले. शस्त्रक्रियेनंतर लक्ष्मीला ८ दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. आज ४० दिवसांनंतर ती पूर्णपणे शुद्धीवर असून दोन दिवसांत तिला घरी सोडले जाणार आहे.
गोळी आली कुठून? पोलीसही चक्रावले
ही घटना बस्तौली गावात घडली. लक्ष्मी आपल्या भावांसोबत छतावर खेळत असताना टिनच्या छताला छिद्र पाडून एक गोळी थेट तिच्या डोक्यात घुसली. परिसरात कोणाकडेही परवाना असलेली बंदूक नाही. मग ही गोळी कोणी झाडली? हा प्रश्न पोलिसांसाठी अजूनही एक गूढ बनून राहिला आहे.
