भिण्ड, 15 ऑक्टोबर : भारतामध्ये अनेक किल्ले आहेत. काही किल्ल्यांच्या कहाण्या खूपच प्रसिद्ध आहेत. यातच एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे चंबल येथील किल्ला. नेमकं हा किल्ला का प्रसिद्ध आहे, यामागची रहस्यमय कहाणी काय आहे, हे आज जाणून घेऊयात.
मध्यप्रदेशातील चंबल येथे एक किल्ला असा आहे, ज्याबाबत असे म्हटले जाते की, जिथे प्रवेशद्वारावर रक्ताचे थेंब पडले होते. भिंड जिल्ह्यातील चंबल नदीजवळ अटेरचा किल्ला आहे. या किल्ल्याची निर्मिती भदौरिया वंशाचे राजा बदन सिंह यांनी 1664 ते 1668 या कालावधी दरम्यान केली होती. या किल्ल्याच्या अनेक रहस्यमयी कहाण्या आहेत. याला प्रामुख्याने खूनी दरवाजा म्हणूनही ओळखले जाते. पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात आणि खूनी दरवाजा पाहण्यासाठी अधिक उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.
advertisement
काय आहे खूनी दरवाजा -
किल्ल्यात प्रवेश करण्याआधी खूनी दरवाजाचे नाव ऐकताच तुम्हाला आश्चर्य वाटेल. मान्यतांनुसार, या दारात एका मेंढ्याचे डोके कापून ठेवले होते आणि खाली एक वाटी ठेवली होती. या वाटीवर रक्त टपकत होते. यावेळी स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की, राजाला भेटणाऱ्या गुप्तचरांना रक्तरंजित दरवाजातून जावे लागायचे. तेव्हा त्यांना रक्ताचा टिळक लावला जायचा.
रक्ताचा टिळा लावल्यानंतर त्यांची राजासोबत भेट व्हायची. तर खूनी दरवाजाशिवाय या किल्ल्याच्या आत पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. यापैकी एक म्हणजे बदन सिंगचा राजवाडा. हा राजवाडासुद्धा प्रेक्षणीयदृष्ट्या खास आहे.
हे आहे लोकेशन -
चंबळमध्ये जर तुम्हालाही खूनी दरवाजा पाहायचा असेल तर तुम्हाला भिंड जिल्ह्याच्या अटेर येथे यावे लागेल. येथून मग तुम्ही भिंडमार्गे थेट अटेर येथे पोहोचू शकतात. हा दरवाजा संपूर्ण चंबळ संभागात प्रसिद्ध आहे.
