बेळगावात दारु तस्करीची घटना समोर आलीय. पोलीसांनी या रॅकेटचा पडदा फाश केला असून त्यांना पकडलंय. इलेक्टरीक डीपीच्या आत कप्पे करून हे रॅकेट गोवा ते तेलंगणा दारूची तस्करी करत होते. वरून वाटताना लाईटचे साहित्य घेऊन जात असल्याचे दिसत होतं.
सायरनचा भीषण आवाज, कॅम्पसमध्ये बॉम्बस्फोट! इस्त्राईल युद्धाचा 'तो' भयानक अनुभव
मात्र बेळगावच्या उत्पादन शुल्क विभागाला याची खबर लागताच त्यांनी पाठलाग करून हा टेम्पो ताब्यात घेऊन तपासणी केल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला. अत्यंत चलाखीने दारू तस्करी करणाऱ्या रॅकेटचा बेळगावच्या उत्पादन शुल्क विभागाने भांडाफोड केला. हे प्रकरण सध्या चांगलाच पेट घेत असून परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे.
advertisement
दरम्यान, अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. तरुणाईचा जास्त कल दारु पिण्याकडे पहायला मिळतो. त्यामुळे तस्करीची दारु घ्यायला ते मागेपुढे पाहत नाही. अनेक लोक याच्या आहारी गेले आहेत. सध्या बेळगावमधील हे तस्करी रॅकेट पोलिसांनी ताब्यात घेतलं.