सायरनचा भीषण आवाज, कॅम्पसमध्ये बॉम्बस्फोट! इस्त्राईल युद्धाचा 'तो' भयानक अनुभव

Last Updated:

नेमकं काय घडलंय काही कळत नव्हतं पण मनात सतत कसलीतरी चिंता सुरू होती, भीती वाटत होती.

तिथे अडकलेल्या भारतीयांना देशात आणण्यासाठी भारत सरकारने 'अजय' मिशन आखलंय.
तिथे अडकलेल्या भारतीयांना देशात आणण्यासाठी भारत सरकारने 'अजय' मिशन आखलंय.
अभिषेक जायसवाल, प्रतिनिधी
वाराणसी, 17 ऑक्टोबर : इस्त्राईल विरुद्ध हमास युद्धाची धग संपूर्ण जगाला बसली आहे. इस्त्राईलमधील सर्वसामान्य लोक सध्या प्रचंड भीतीखाली जगत आहेत. तिथे अडकलेल्या भारतीयांना देशात आणण्यासाठी भारत सरकारने 'अजय' मिशन आखलंय. या मिशनअंतर्गत अनेक भारतीय मायदेशी परतले असून त्यांना आलेला युद्धाचा अनुभव ऐकताना अक्षरशः अंगावर काटा येतो.
उत्तर प्रदेशच्या वाराणसीतील रहिवासी राहुल सिंह हे इस्त्राईलहून सोमवारी भारतात आले. घरी परतताच सुखरूप मायदेशी आणल्याबद्दल त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. शिवाय आपल्याला आलेला युद्धाचा भयंकर अनुभवदेखील सांगितला.
advertisement
राहुल म्हणाले, '7 ऑक्टोबरला युद्ध सुरू झालं तेव्हा मी जेरुसलेममध्ये होतो. मोठमोठ्याने सायरन वाजत होतं. नेमकं काय घडलंय काही कळत नव्हतं पण मनात सतत कसलीतरी चिंता सुरू होती, भीती वाटत होती. हॉस्टेलपासून काही अंतरावर कॉलेज कॅम्पसमध्ये अचानक बॉम्बस्फोट झाला आणि आम्ही एकदम शांत झालो. प्रचंड घाबरलो. सगळंकाही एवढं पटापट घडलं की, सामान आणायलाही बाहेर पडता आलं नाही. जवळ फक्त 2 दिवसांचंच जेवणाचं सामान होतं आणि बाहेर जायची भीती वाटत होती. त्यावेळी शेजाऱ्यांनी फार मदत केली. त्यांच्याच मदतीने सुपर मार्केटमध्ये जाऊन आधी सामान घेऊन आलो. 7 ते 10 ऑक्टोबरपर्यंतचे दिवस अतिशय खतरनाक होते. युद्धादरम्यान इस्त्रायली सरकारने मोबाईलबाबतही काही अटी जारी केल्या होत्या. त्यामुळे 24 तास घरच्यांशी बोलणं झालं नाही. ज्यामुळे घरचे लोक आणखी घाबरले. त्यांनी वाराणसीच्या पंतप्रधान जनसंपर्क कार्यालयात जाऊन याबाबत माहिती दिली.'
advertisement
दरम्यान, त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणात लक्ष घातलं आणि अजय मिशन अंतर्गत राहुल यांना सुरक्षितपणे घरी आणलं. राहुल हे 2022च्या डिसेंबर महिन्यात इस्त्राईलला गेले होते. ते तिथल्या द हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ जेरुसलेममध्ये फार्मसी विषयात पीएचडीचं शिक्षण घेत आहेत.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
मराठी बातम्या/देश/
सायरनचा भीषण आवाज, कॅम्पसमध्ये बॉम्बस्फोट! इस्त्राईल युद्धाचा 'तो' भयानक अनुभव
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement