TRENDING:

राम मंदिलाला लावलेलं हे Magical Lock आहे जगप्रसिद्ध; 3 चाव्यांशिवाय उघडत नाही कुलूप

Last Updated:

Magic Lock of Aligrh: अलिगढचे जादुई कुलूप जगभर प्रसिद्ध आहे. इथलंच कुलूप आज अयोध्येतील राम मंदिरातही लावण्यात आले आहे. काय आहे खासीयत?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अलिगढ : उत्तर भारतात हिंदीची एक म्हण प्रसिद्ध आहे. 'चोरों को याद आती है खाला, जब दरवाजे पर लगा हो अलीगढ़ का जादुई ताला' अलिगडचे जादुई कुलूप पाहिल्यास ही म्हण अगदी चपखल असल्याचं तुम्हीही म्हणाल. अलिगडचं शिक्षण जसं जगभर प्रसिद्ध आहे तसंच प्रसिद्ध आहे इथलं कुलूप. अलिगढचं कुलूप देशभरात प्रसिद्ध आहे त्याच्या मजबुतीमुळे. कुठल्याही चोराला तोडता येणार नाही अशी मजबूत कुलपं या जिल्ह्यात तयार होतात. अलिगढमध्ये 300 ग्रॅम पासून 400 किलोपर्यंतचे कुलपं तयार केली जाताात.
News18
News18
advertisement

या जिल्ह्याने जगाला अशी अनेक अद्भुत कुलपं दिली आहेत. त्यापैकीच एक मजबूत अयोध्येतील राम मंदिरात लागलेलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अलिगढ लॉकची गोष्ट सांगणार आहोत, ज्याला Magical Lock म्हणतात.

अलीगडच्या जावेद नावाच्या कारागिराने हे कुलूप तयार केले आहे. याला जादुई कुलूप म्हणण्याचे कारण म्हणजे त्यात चावी ठेवायला जागा नसते, पण तरीही हे कुलूप 3 किल्ल्यांनी   उघडते. या कुलपाची रचना मुघल राजवटीतील आहे. हे कुलूप अतिशय वेगळे दिसत असले तरी हे लॉक उघडण्याचे प्रशिक्षण घेतल्याशिवाय हे लॉक उघडणे अशक्य आहे.

advertisement

माहीत नसेल तर किल्ली असूनही उघडता येणार नाही कुलूप

अलिगढचे सहाय्यक आयुक्त उद्योग राजमन शर्मा यांनी माहिती देताना सांगितले की, अलिगढ लॉकसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. अलिगडमध्ये लॉकशी संबंधित लोक आपापल्या परीने काही ना काही इनोव्हेशन करत असतात. तेथे एक कारागीर मोहम्मद जावेद आहे, ज्याने कुलूप बनवले आहे.

advertisement

बाहेरून बघितलं तर किल्ली घालायला जागाच दिसत नाही. या लॉकची खासियत म्हणजे जोपर्यंत कुणी तुम्हाला लॉक उघडण्याची ट्रिक सांगणार नाही. तोपर्यंत तुम्ही हे कुलूप उघडू शकणार नाही. अगदी सगळ्या किल्ल्या जवळ असूनसुद्धा. म्हणूनच आपण या लॉकला जादुई लॉक या नावाने हाक मारतो. अलिगडमध्ये मोजकेच कारागीर आहेत, जे असे अनोखे कुलूप बनवू शकतात.

advertisement

पितळी कुलपाचे वजन माहिती आहे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुळाची झाली भाव वाढ, केळी आणि आल्याची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

हे कुलूप पितळ्याचे असून त्यात थोडे लोखंडही ओतण्यात आले आहे. याचे वजन सुमारे 800 ते 900 ग्रॅम आहे. ते बनवण्यासाठी सुमारे 1000 रुपये खर्च आला आहे. या प्रकारचे कुलूप 2000 ते 2500 रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे. हे कुलूप तयार करण्यासाठी सुमारे दीड महिन्यांचा कालावधी लागला. आतापर्यंत अशी मोजकीच कुलूपं तयार करण्यात आली आहेत.

advertisement

मराठी बातम्या/देश/
राम मंदिलाला लावलेलं हे Magical Lock आहे जगप्रसिद्ध; 3 चाव्यांशिवाय उघडत नाही कुलूप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल