बांका : आपल्या सर्वांच्या आयुष्यात शिक्षण हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय तुमचे भविष्य अपूर्ण आहे. त्यामुळे अनेक संस्था आणि लोक आपापल्या परीने शिक्षणाबाबत जनजागृती करत आहेत. अशीच एक व्यक्ती आहे, जे आपल्या कवितेतून लोकांना जागरुक करत आहेत.
विश्वनाथ महतो असे या 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. ते बिहारच्या बांका येथील अमरपूरच्या कटहरा गावातील रहिवासी आहेत. विश्वनाथ महतो गावोगावी जाऊन आपल्या व्यथा कवितेतून लोकांना सांगतात. ते आपल्या कवितेच्या माध्यमातून लोकांना जागरुक करत आहेत. त्यांनी आपल्या कवितेत सर्व व्यवस्था आणि भ्रष्टाचाराला एकत्र शब्दात मांडला आहे.
advertisement
विश्वनाथ महतो यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, 60 वर्षांपूर्वी शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती, पण त्याकाळी शिक्षणाचा खूप अभाव होता. त्यामुळे त्यांना मॅट्रिकनंतर पुढील शिक्षण घेता आले नाही. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते शेतीच्या कामात गुंतले. यादरम्यान त्यांचे लग्न झाले आणि त्यांना एक मुलगा झाला. त्यांच्या मुलाला त्यांना एका चांगल्या शाळेत शिक्षण द्यायचे होते. मुलगा शिकून मोठ्या पदावर जावा, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, बिहार राज्यात सुरू असलेला भ्रष्टाचार आणि त्यांची स्वत:ची आर्थिक परिस्थितीमुळे ते आपली इच्छा पूर्ण करू शकले नाहीत. कारण प्रत्येक गावात सरकारी शाळांपेक्षा कॉन्व्हेंटची व्यवस्था जास्त आहे. या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेली मुलेच शिक्षण घेऊ शकतात.
भारतीय सनातन संस्कृती इटलीच्या नवरा-बायकोला भावली, वाराणसीत घेतला मोठा निर्णय
विश्वनाथ महतो यांनी सांगितले की, किहर गाव आणि परिसरात चार-पाच असे दलाल असायचे जे संपूर्ण गावाचा भार आपल्या डोक्यावर घेऊन फिरायचे. त्यांना असे वाटते की, ते गावाचे सर्वकाही आहेत आणि त्यांच्याशिवाय गावात काहीच होऊ शकत नाही. तुम्हाला जर काही चांगले करायचे असेल तर अशाप्रकारचे लोक नेहमी तुम्हाला त्रास देण्याचे कार्य करतील.
ते म्हणाले, तुम्हाला जर काही चांगलं काम सुरू करायचं असेल तर तुम्हाला गावात किंवा शहरात अशी अनेक माणसं सापडतील जी तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. यामुळेच ते दुर्बल घटकातील असल्याने त्यांना काहीही करता आले नाही. त्यामुळे ते आता कवितेतून आजूबाजूला सुरू असलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
