सहारनपूर : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडूचे असते. असाच एक खेळाडू राजेश आर्य, जो आपल्या देशात पूर्वी प्रसिद्ध असलेला 'शाओलिन कुंग फू' हा प्रकार पुन्हा रुजवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावण्यासाठी अहोरात्र झटत असे. पण आज तो खेळाडू पूर्णपणे उद्विग्न अवस्थेत जगत आहे. आतापर्यंत मिळालेली शेकडो पदकं धूळ खात पडून आहेत आणि तो केवळ अडीच ते तीन फुटांचे दुकान चालवून गुजराण करत आहे.
advertisement
आम्ही बोलत आहोत उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील रहिवासी राजेश आर्य यांच्याबद्दल. वयाच्या 9 व्या वर्षापासून कुंग फू कराटे शिकण्यास राजेशने सुरुवात केली. राजेश आर्य यांची कुंग फू कराटे, मार्शल आर्ट्स शिकण्याची आवड आणि त्यातली प्रगतीइतकी होती की, त्यांनी राष्ट्रीय स्तरावर 47 सुवर्णपदके आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 7 सुवर्णपदके जिंकली. रौप्य आणि ब्राँझ पदकांची तर गणतीच नाही एवढी आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकवेळा देशाचे नाव उज्ज्वल करणारे राजेश आर्य आज अज्ञातवासात का जगत आहेत?
मार्शल आर्टमध्ये आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेते राजेश आर्य यांनी सहारनपूरच्या गुरु नानक इंटर कॉलेजमधून बारावी केली. दीड वर्षांपूर्वी पत्नीच्या निधनानंतर, राजेश आर्य यांनी घरखर्च चालवण्यासाठी छोटेसे दुकान सुरू केले. राजेश आर्य यांचा मुलगा आणि मुलगीही मार्शल आर्टमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक विजेते आहेत. राजेश आर्य यांनी 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या सरकारी अभियानांतर्गत 3316 शाळांमध्ये 3 लाखांहून अधिक महिला व मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले.
नोकरी सोडली अन् सुरु केला बांबूच्या वस्तूंचा व्यवसाय, आता 50 लाखापर्यंत उलाढाल
"मेडल्स कचऱ्यासारखी पडून आहेत." राजेश आर्य सांगतात की, इतकी पदके मिळवणं हा त्यांचा एके काळचा ध्यास होता. जो आज संपला आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदके जिंकल्यानंतरही ही सर्व पदके घराच्या कानाकोपऱ्यात धूळ खात पडून आहेत. आपली आवड आज अशा वळणावर आणेल की उदरनिर्वाहासाठी छोटंसं दुकान चालवावं लागेल, याची राजेश आर्य यांना अपेक्षा नव्हती. समाजाचं मागासलेपण आणि कमी शिक्षण हे त्यांच्या प्रगतीच्या आड आल्याचे राजेश आर्य सांगतात.
आपल्या पदकांकडे हताश नजरेने पाहताना राजेश यांना अश्रू आवरत नाहीत. "ही मेडल्स पाहून पुन्हा पुन्हा मनाचा दुखरा कोपरा समोर येतो आणि मग अश्रू बाहेर पडतात."
साडीतली सुपरवुमन! 3 वर्षे 10-10 तास केला सराव, गावाकडच्या लेकीचं जगात गाजतंय नाव
सर्व खेळाडूंनी खेळाबरोबर शिक्षणाकडेही लक्ष द्यायचं आवाहन राजेश करतात. नाहीतर खेळाडूने त्याच्या प्रांतात कितीही उंची गाठली तरी शिक्षणाशिवाय सगळी मेहनत पाण्यात जाईल. राजेश आर्य सांगतात की, काही काळानंतर सरकारकडून जुन्या खेळाडूंकडे दुर्लक्ष होते. गावखेड्यातून येणाऱ्या तरुणांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण होत असेल, तर त्याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे.
