साडीतली सुपरवुमन! 3 वर्षे 10-10 तास केला सराव, गावाकडच्या लेकीचं जगात गाजतंय नाव!
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
बारटेंडर कविता मेधार या मुळच्या कर्नाटकातील असून पुण्यात राहतात. गावाकडची मुलगी ते जागतिक विक्रमवीर असा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : क्षेत्र कुठलं ही असलं तरी तुमचे अथक परिश्रम हे तुम्हाला नक्कीच यशाच्या शिखरावर नेत असतात. पण त्यासाठी हवे ते तुमची कष्ट करण्याची जिद्द आणि चिकाटी. याच उत्तम उदाहरणं म्हणजे मुळच्या कर्नाटकच्या असलेल्या कविता मेधार या होय. गेली 8 वर्ष त्या पुण्यात बारटेंडिंग शिकत आहे. कविता यांनी 2021 मध्ये 'ओव्हर द शोल्डर वन हॅन्ड टू बॉटल वन मिनिट्स 122 फिलिप्स' करून जागतिक विक्रम केला आहे. विशेष म्हणजे असा विक्रम करणाऱ्या कविता या पहिला महिला आहेत.
advertisement
साडीतली सुपरवुमन
कविता यांचा बारटेंडिंग करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. साडी परिधान केलेली, एका हातात मुल आणि एका हाताने त्या काचेच्या बाटल्यांसोबत बारटेंडिंग करताना दिसत आहेत. कविता या मुळच्या कर्नाटकातील एका छोट्या खेड्यातील आहेत. सध्या त्या पुण्यातील पुणे स्टेशन परिसरात असलेल्या फ्लाईर मनिया बारटेंडिंग अकॅडेमीमध्ये प्रशिक्षक आहेत. 3 वर्षे मेहनत घेऊन त्यांनी जागतिक विक्रम केला आहे.
advertisement
कसा आहे प्रवास?
"मी 18 वर्षाची असताना पुण्यात आले. मला बार टेंडिंग बदल मला माहिती नव्हतं. माझे मामा राज मेधार यांनी मला या फिल्ड बद्दल शिकवलं. मग माझी आवड तयार होत गेली. मी जवळ पास 8 वर्ष या क्षेत्रात काम केलं. एक दिवस मी गूगलवर सर्च केलं. तेव्हा लक्षात आलं की बार टेंडिंगमध्ये एकाही महिलेचा रेकॉर्ड नाही. कोरोना काळात 3 वर्ष प्रॅक्टिस केली आणि नंतर हा रेकॉर्ड तयार झाला," असं कविता सांगतात.
advertisement
आई-वडिल करतात शेती
"कर्नाटकमधील एका छोट्या खेड्यात आई-वडील शेती करतात. मी सुरुवात बारटेंडिंग शिकायला सुरुवात 18 व्या वर्षी केली. 8 वर्षे सतत सराव केला, तेव्हा हा विक्रम करू शकले. त्यासाठी 3 वर्षे रोज 8 ते 10 तास सराव करत होते. आता जागतिक विक्रम झाला आहे. विशेष म्हणजे असा विक्रम करणारी मी पहिलीच महिला असल्याचा अभिमान वाटतो. आता सर्व स्तरांतून कौतुक होत असल्यानं सेलिब्रेट फील होतंय. लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. मात्र, बारटेंडिंग या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे," असंही कविता सांगतात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 21, 2024 11:29 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
साडीतली सुपरवुमन! 3 वर्षे 10-10 तास केला सराव, गावाकडच्या लेकीचं जगात गाजतंय नाव!