बेपत्ता लोकांना शोधणारा देवदूत, तब्बल 351 जणांना मिळवून दिलं कुटुंब! नेमकं काय केलं?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
मुंबईतील शिवाजी खैरनार हे 2018 पासून एक सुज्ञ नागरिक या नात्यानं पोलीस मित्र म्हणून काम करतात. एखादी व्यक्ती हरवल्याचं प्रकरण समजलं की ते त्याचा शोध सुरू करतात.
प्रियांका जगताप, प्रतिनिधी
मुंबई: आपला नोकरी धंदा सांभाळून काहीजण समाजसेवेचं व्रतही जपतात. मुंबईतील शिवाजी खैरनार यांनीही असंच एक व्रत जपलंय. बेपत्ता व्यक्तींसाठी जणू ते देवदूतच ठरत आहेत. आतापर्यंत त्यांनी तब्बल 351 हरवलेल्या लोकांना आपलं घर पुन्हा मिळवून दिलंय. त्यांच्या या कार्याची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आलीय. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांनी त्यांना सन्मानित केलंय.
advertisement
शिवाजी खैरनार हे 2018 पासून एक सुज्ञ नागरिक या नात्यानं पोलीस मित्र म्हणून काम करतात. एखादी व्यक्ती हरवल्याचं प्रकरण समजलं की ते त्याचा शोध सुरू करतात. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून हा शोध घेतला जातो. "मी स्वतः बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचा सहकार्यवाह असल्यामुळे मुंबईमधील गणेशोत्सव मंडळांच्या व्हाट्सअप ग्रुपवर व दहीहंडी समन्वय समितीमध्ये असल्यामुळे दहीहंडी मंडळाच्या ग्रुपवर माहिती देतो. तसेच नवरात्र उत्सव मंडळ, विविध सामाजिक ग्रुपमध्येही हरवलेल्या व्यक्तीची माहिती देऊन शोध घेतो," असे शिवाजी सांगतात.
advertisement
460 लोकांचे ब्रॉडकास्ट ग्रुप
या शोध मोहिमेत अनेक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, दहीहंडी मंडळ, नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते जोडले गेले. तसेच ज्यांना समाजासाठी काहीतरी करायचे आहे, असे काही सुज्ञ नागरिकही या शोध मोहिमेचा भाग झाले. त्यामुळे आतापर्यंत 460 लोकांचे ब्रॉकास्ट ग्रुप आपल्याकडे तयार झाले. या माध्यमातून आतापर्यंत आपण यशस्वी शोध मोहीम राबवून 351 नागरिकांना सुखरूप घरी पोहोचवले, असेही खैरनार यांनी सांगितले.
advertisement
विविध पुरस्कारांनी सन्मानित
शिवाजी खैरनार यांच्या कार्याचा देश विदेशातून गौरव करण्यात आला आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनने त्यांच्या कार्याची दखळ घेऊन सन्मानित केलंय. तर ऑप्टिमास्टिक शाळेतर्फे समाज रत्न पुरस्कार, अष्टगंध संस्थेतर्फे समाजरत्न पुरस्कार , मुंबई उद्योजक मध्येही मराठी चित्रपट सेनेतील पूजा सावंत यांच्या हस्ते सामाजिक कार्याचा सन्मान करण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 21, 2024 9:49 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
बेपत्ता लोकांना शोधणारा देवदूत, तब्बल 351 जणांना मिळवून दिलं कुटुंब! नेमकं काय केलं?