TRENDING:

Navy Staffer Arrested : ऑनलाइन गेमिंगने घात केला, देशासोबत गद्दारी, नौदलाचा कर्मचारी अटकेत

Last Updated:

Navy Staffer Arrested : भारताच्या संरक्षण खात्यातील कर्मचाऱ्यांभोवती कारवाई सुरू आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नौदलाच्या एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मागील काही महिन्यांपासून तपास यंत्रणांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा फास घट्ट केला आहे. सोशल मीडियावरील इन्फ्लूएन्सरही अटकेत आहेत. तर, दुसरीकडे भारताच्या संरक्षण खात्यातील कर्मचाऱ्यांभोवती कारवाई सुरू आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नौदलाच्या एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
ऑनलाइन गेमिंगने घात केला, देशासोबत गद्दारी, नौदलाचा कर्मचारी अटकेत
ऑनलाइन गेमिंगने घात केला, देशासोबत गद्दारी, नौदलाचा कर्मचारी अटकेत
advertisement

पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी नौदल भवन येथील अप्पर डिव्हिजन क्लार्क (यूडीसी) विशाल यादवला अटक केली आहे. विशाल सोशल मीडियाद्वारे गुप्तचर माहिती पाठवत असल्याचे समोर आले आहे. राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर शाखेने नवी दिल्ली येथून ही अटक केली.

पोलीस महानिरीक्षक (सीआयडी-सुरक्षा) विष्णुकांत गुप्ता म्हणाले की, यूडीसी विशाल यादवला बुधवार, 25 जून रोजी 'अधिकृत गुप्तहेर कायदा 1923' अंतर्गत अटक करण्यात आली. तो पुंसिका रेवाडी (हरियाणा) येथील रहिवासी आहे. गुप्ता म्हणाले की, राजस्थान पोलिसांचे 'सीआयडी-गुप्तचर' पाकिस्तानी गुप्तचर संस्थांच्या हेरगिरीच्या कारवायांवर सतत लक्ष ठेवून होते.

advertisement

विशाल सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानला माहिती

दिल्लीतील नौदल भवनातील 'डॉकयार्ड डायरेक्टरेट'मध्ये काम करणारा विशाल यादव सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एका महिला हँडलरशी सतत संपर्कात असल्याचे समोर आले. प्रिया शर्मा असे टोपणनाव असलेली ही महिला नौदल भवनमधून धोरणात्मक महत्त्वाची गोपनीय माहिती काढण्यासाठी विशालला पैशाचे आमिष दाखवत होती.

ऑनलाइन गेमच्या व्यसनाने केला घात...

advertisement

गुप्ता यांनी सांगितले की, "प्राथमिक तपासानुसार, विशाल यादव ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसनात होता आणि त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तो पाकिस्तानातील महिला हँडलरला संवेदनशील माहिती पुरवू लागला." त्याला त्याच्या क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग खात्यात 'USDT' मिळत होता आणि थेट त्याच्या बँक खात्यात निधी येत होता."

मोबाइल चॅटमधून अनेक गुप्त कागदपत्रे समोर...

संशयिताच्या मोबाईलमधून सापडलेल्या चॅट्स आणि कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की 'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेदरम्यानही विशालने पाकिस्तानी महिलेला नौदलाशी आणि इतर संरक्षणाशी संबंधित गोपनीय माहिती पुरवली होती. विविध गुप्तचर संस्ंथाकडून जयपूरमध्ये

advertisement

संयुक्तपणे विशालची चौकशी करत आहेत. त्याने आतापर्यंत पाकिस्तानला कोणती माहिती पाठवली, याची माहिती घेतली जात आहे.

मराठी बातम्या/देश/
Navy Staffer Arrested : ऑनलाइन गेमिंगने घात केला, देशासोबत गद्दारी, नौदलाचा कर्मचारी अटकेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल