कशामुळे झाली होती हत्या
RSSची शाखा उघडण्यावरून झालेल्या राजकीय वादातून रिजित हत्या झाली होती. शाखा उघडण्यावरून सुरू झालेल्या हा वाद राजकीय संघर्षात बदलला. १० ऑक्टोबर २००५ रोजी कन्नूर जिल्ह्यातील थाचानकंडी येथील मंदिराजवळ रिजित आणि त्यांच्या मित्रांवर तलवारी, चाकूने हल्ला झाला होता. जखमी अवस्थेत रिजितचे रुग्णालयात जात निधन झाले होते.
OYO ने घेतला मोठा निर्णय, तुम्हाला रूम मिळणार की नाही ते एकदा वाचाच
advertisement
थलशेरी अतिरिक्त सत्र न्यायालयाने रिजितच्या हत्येप्रकरणी व्ही.व्ही. सुधाकरण (वय-56), के.टी. जयेश (वय-39), सी.पी. रंजीत, पी.पी. अजींद्रन (वय-50), आय.व्ही. अनिल कुमार (वय-51), पी.पी. राजेश (वय-46), व्ही.व्ही. श्रीकांत (वय-46), व्ही.व्ही. श्रीजित (वय-42), आणि टी.व्ही. भास्करन (वय-66) या नऊ जणांना दोषी ठरवले आहे. या खटल्यात आणखी एक दहावा आरोपी होता, मात्र खटला संपण्यापूर्वीच त्याचे निधन झाले.
हिमालयातील 32.6 मेट्रिक टन सोन्याचे रहस्य काय? इथे दडलाय ६०० अब्ज रुपयांचा खजिना
आरएसएस-भाजप गटाने राजकीय वादातून रिजित यांची हत्या केली. हे आमचे म्हणणे न्यायालयाने मान्य केले. आम्ही पुरावे सादर करून खटला सिद्ध केला, असे विशेष सरकारी वकील बी.पी. ससींद्रन यांनी निकालानंतर सांगितले. या खटल्या दरम्यान सरकारी पक्षाकडून २८ साक्षीदार, ५९ कागदपत्रे आणि अन्य ५० हून अधिक पुरावे सादर करण्यात आले.
पाणीपुरीवाल्याला आली ४० लाखांची GST नोटीस; UPIद्वारे पैसे घेतल्याने लागला सुगावा
कोर्टाच्या निकालानंतर रिजितच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले. आम्ही या दिवसाची 19 वर्षे वाट पाहिली, अशी प्रतिक्रिया रिजितची बहिण श्रीजाने दिली. आम्हाला आशा आहे की सर्व दोषांना कठोर शिक्षा मिळेल, असे तिने म्हटले.
