त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. जवाहरलाल यांचा जबाबही तपास अहवालात नोंदवण्यात आला आहे. उपचारात, 4 वेळा अँटी-वेनमचे सामान्य डोस दिल्याचं सांगितलं गेलं आहे. चौकशीदरम्यान तपास पथकाने त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. जवाहरलाल यांना विचारलं की, विकास दुबेला कोणत्या जातीचा साप चावला होता. त्यावर डॉ. जवाहरलाल म्हणाले की, मला सापाची प्रजाती माहीत नाही. पीडित आणि त्याच्या कुटुंबीयांच्या विनंतीवरून, मी त्याच्यावर सात वेळा उपचार केले आणि चार वेळा त्याला अँटी व्हेनमचा सामान्य डोस दिला.
advertisement
शेतातून रात्रंदिवस यायचे आवाज; एकसोबत अख्खं गावच पाहण्यासाठी गेलं, कारण समजताच भीतीने उडाला थरकाप
त्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने पुन्हा डॉ. जवाहरलाल यांना विचारलं की, तुम्हाला सापाच्या प्रजातीची माहितीच नाही, मग तुम्ही अँटी व्हेनमचा डोस कसा दिला? त्यावर डॉ. समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. वनविभागाचं पथकही या प्रकरणाचा तपास करत आहे. डीएफओ रामानुज त्रिपाठी यांनी सांगितलं की, आतापर्यंतच्या तपासात विकास दुबे व्यतिरिक्त कोणीही साप पाहिला नसल्याचं वास्तव समोर आलं आहे. विकास दुबे याला साप चावलेल्या ठिकाणांचीही तपासणी करण्यात आली, मात्र तिथे साप आढळून आला नाही.
विकास दुबे यानी सांगितलं की, 40 दिवसांत मला 7 वेळा साप चावला. त्याने स्वतः सापाला तीन वेळा पाहिलं आहे. आतापर्यंतच्या तपासात प्रथमदर्शनी ही घटना संशयास्पद वाटत आहे. सर्पदंशाने त्रस्त असलेला 24 वर्षीय विकास दुबे हा मलवा पोलीस स्टेशन हद्दीतील सौरा गावचा रहिवासी आहे. विकास दुबे यानी दावा केला आहे की, त्याला 40 दिवसांत सात वेळा साप चावला आहे. प्रत्येक वेळी साप चावण्यापूर्वी त्याला धोक्याची जाणीव होते. त्याला शनिवार आणि रविवारीच साप चावला होता. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून त्रस्त असलेला विकास दुबे कुटुंबीयांसह मेहंदीपूर बालाजीच्या दरबारात आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, काही तांत्रिकांनी त्यांना सल्ला दिला आहे की, बालाजीच्या दरबारात जाऊन त्यांना सर्पकाल दोषापासून मुक्ती मिळेल.