पाकिस्तानमधील बिलाल टेरर कॅम्पचा प्रमुख आणि कुख्यात दहशतवादी याकूब मुगल याचा भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये खात्मा झाला आहे. याकूबच्यानंतर त्याच्या गावात धार्मिक अंत्यविधी पार पडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दफनविधीला अनेक कट्टरवादी नेते आणि समर्थक उपस्थित होते. यामध्ये पाकिस्तानी लष्कराशी आणि गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधिता काही महत्त्वाच्या व्यक्तींचाही समावेश होता, अशीही माहिती समोर आली आहे.
advertisement
याकूब मुगल हा भारतविरोधी दहशतवादी कारवायांसाठी ओळखला जात होता. त्याच्या नेतृत्वाखाली बिलाल कॅम्पमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण, बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण आणि दहशतवादी कारवायांची तयारी केली जात होती. पुंछ, राजौरी, आणि काश्मीरमधील अनेक घातपाती हल्ल्यांमध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचा भारताच्या गुप्तचर यंत्रणांचा दावा आहे.
भारताच्या अलीकडील कारवाईत याकूब मुगल मारला गेला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र पाकिस्तानी अधिकृत सूत्रांनी त्याच्या मृत्यूबाबत कोणताही स्पष्ट खुलासा केलेला नाही.