Operation Sindoor : 25 मिनिटांत तीच 9 ठिकाणं बेचिराख का केली? भारतीय लष्कराच्या वाघिणींनीं सगळं सांगितलं

Last Updated:

Indian Army On Operation Sindoor: भारतीय लष्कराकडून 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेला कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला सैन्याधिकाऱ्यांनी संबोधित केले.

25 मिनिटांत तीच 9 ठिकाणं बेचिराख का केली? भारतीय लष्कराच्या वाघिणींनीं सगळं सांगितलं
25 मिनिटांत तीच 9 ठिकाणं बेचिराख का केली? भारतीय लष्कराच्या वाघिणींनीं सगळं सांगितलं
Indian Army Press Conference On Operation Sindoor: मंगळवारी रात्री उशिरा भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. भारताच्या तिन्ही सैन्यांची ही संयुक्त कारवाई केली. 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव या विशेष मोहिमेला देण्यात आले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळावर हल्ले केले. या एअर स्ट्राइकमध्ये 90 दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. तर, अनेक दहशतवादी जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराकडून 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेला कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला सैन्याधिकाऱ्यांनी संबोधित केले. परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिस्त्री हे देखील यावेळी उपस्थित होते.
परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना दिले जाणाऱ्या पाठबळावर भाष्य केले. पाकिस्तानकडून भारताविरोधात दहशतवादी कारवाया सुरू आहेत. दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान हा स्वर्ग आहे. भारताविरोधात कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात भारत कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती दिली. या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोणत्या तळावर एअर स्ट्राइक केला, त्या मागील कारण काय याची माहिती या दोन वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांनी दिली.
advertisement
'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतानं पाकिस्तानमधले 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत. पण भारतानं नेमकी हीच तळ का उद्धवस्त केली?
बहावरपूर - या ठिकाणी जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय आहे. भारतीय सीमारेषेपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या याच ठिकाणी दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो.
मुरीदके - सांबातील सीमारेषेपासून 30 किलोमीटर अंतरावर लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी तळ आहे. 2008 मध्ये झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी इथूनच आले होते.
advertisement
गुलपूर - नियंत्रण रेषेजवळ पूंछ आणि राजौरीपासून 35 किलोमीटरवर हा दहशतवाद्यांचा तळ आहे. 20 एप्रिल 2023 आणि 24 जून 2024 मध्ये भाविकांवर झालेल्या हल्ल्याचा प्लान इथूनच ठरवण्यात आला होता.
सवाई - पीओकेमध्ये तंगधार सेक्टरपासून 30 किलोमीटर अंतरावर हा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी तळ आहे. 21 ऑक्टोबर 2024मध्ये गांदरबाल, 24 ऑक्टोबर 2024मध्ये गुलमर्ग आणि 22 एप्रिल 2025 पहलगाम इथं झालेल्या हल्ल्याचा कट इथंच रचला होता.
advertisement
बिलाल - हा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवाद्यांना भारतात घुसखोरीसाठी पाठवण्याचा लाँच पॅड आहे.
कोटली - राजौरी इथल्या सीमेपासून 15 किलोमीटर अंतरावर हा लष्कर-ए-तोयबाचा लष्करी तळ आहे. इथं जवळपास 50 दहशतवादी होते.
बरनाला - राजौरी जवळ 10 किलोमीटर अंतरावर हा दहशतवाद्यांचा तळ होता.
सरजाल - सांबा-कठुआ सीमेजवळ नियंत्रण रेषेपासून 8 किलोमीटर अंतरावर हा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी तळ होता.
advertisement
महमूना - सियालकोटजवळ नियंत्रण रेषेपासून 15 किलोमीटर दूरवर हा हिजबुल्ला दहशतवादी संघटनेचा तळ होता.
मराठी बातम्या/देश/
Operation Sindoor : 25 मिनिटांत तीच 9 ठिकाणं बेचिराख का केली? भारतीय लष्कराच्या वाघिणींनीं सगळं सांगितलं
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement