advertisement

Pune Crime : 'मला तुझ्यासोबत...', पुण्यात 25 वर्षाच्या तरुणाकडून शरिरसुखाची मागणी, हडपसरमध्ये भरदिवसा काय घडलं?

Last Updated:

Pune Harrasment Crime : पुण्यातील हडपसर परिसरात एक संतापजनक घटना समोर आली असून, घरात कोणी नसल्याची संधी साधून एका 25 वर्षीय तरुणाने तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Pune Crime 25 year old man who demanded sexual favors
Pune Crime 25 year old man who demanded sexual favors
Pune Crime News : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतीय. पुण्यातील हडपसर परिसरात (Hadapsar Crime) एक संतापजनक घटना समोर आली असून, घरात कोणी नसल्याची संधी साधून एका 25 वर्षीय तरुणाने तरुणीचा विनयभंग (Harrasment) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर लक्ष्मीनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

घरात घुसून तरुणीशी अश्लील चाळे

अटकेत असलेल्या आरोपीचे नाव कुणाल सोपान गायकवाड (वय 25, रा. विजया हॉटेलजवळ, बडकीनाला, हडपसर) असं आहे. तो मद्यधुंद अवस्थेत असताना त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने भरदिवसा घरात घुसून तरुणीशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पीडित महिला प्रचंड दहशतीखाली होती.
advertisement

तरुणीने आरडाओरडा केला अन्....

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी घरात एकटीच असताना आरोपी कुणाल दारूच्या नशेत धुत होऊन तिच्या घरात शिरला. तिथे त्याने तरुणीसोबत अश्लील वर्तन करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे तरुणीने आरडाओरडा केला, मात्र तरीही आरोपीने आपले चाळे सुरूच ठेवले होते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
advertisement

वैमनस्यातून तीक्ष्ण शस्त्राने वार

दरम्यान, पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना कात्रजमधील संतोषनगर परिसरात घडली. या प्रकरणी टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी (दि. २९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अजमल हा कात्रजमधील संतोषनगर भागातून निघाला होता. त्या वेळी आरोपींनी अजमला याला अडवले. त्याला शिवीगाळ करून तीक्ष्ण शस्त्राने वार केले.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : 'मला तुझ्यासोबत...', पुण्यात 25 वर्षाच्या तरुणाकडून शरिरसुखाची मागणी, हडपसरमध्ये भरदिवसा काय घडलं?
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement