पुण्यात बाहेरून हॉटेल लॉक; दरवाजा तोडताच आत अंधार अन् प्रचंड गर्दी, सत्य समजताच पोलीसही हादरले
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
बाहेरून हॉटेलला कुलूप, आत अंधार... पण जेव्हा पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने शटरचे लॉक तोडले, तेव्हा आतलं दृश्य पाहून पोलीसही चक्रावले.
पुणे : पुण्यात गुन्हेगारांनी पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आता नव्या युक्ती शोधून काढल्या आहेत. स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये असाच काहीसा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बाहेरून हॉटेलला कुलूप, आत अंधार... पण जेव्हा पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने शटरचे लॉक तोडले, तेव्हा आतलं दृश्य पाहून पोलीसही चक्रावले. 'एलडिनेरो' हॉटेलच्या नावाखाली सुरू असलेल्या या काळबेरं व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
नेमका काय घडला थरार?
स्वारगेटमधील लक्ष्मीनारायण चौकातील 'मोदी प्लाझा' इमारतीत 'एलडिनेरो' हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये बेकायदेशीर हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस पथक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले. मात्र, हॉटेलचे शटर घट्ट बंद होते. पोलिसांनी वारंवार आवाज देऊनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय बळावल्याने पोलिसांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.
advertisement
शटर तुटलं अन् गुपित उघडलं!
अग्निशमन दलाच्या जवानांनी शटरचे कुलूप तोडताच पोलिसांनी आत धाड टाकली. बाहेरून बंद वाटणाऱ्या या हॉटेलमध्ये आत मात्र ग्राहकांची मोठी गर्दी होती. कामगार ग्राहकांकडून रोख रक्कम घेऊन त्यांना तंबाखूजन्य हुक्का पुरवत होते. बाहेरून शांत दिसणाऱ्या या हॉटेलमध्ये आत हुक्क्याचा धूर आणि बेकायदेशीर व्यवहार जोमात सुरू असल्याचे पाहून पोलीसही अवाक झाले.
advertisement
मालकासह ७ जणांवर गुन्हा
या कारवाईत पोलिसांनी हॉटेल मालक प्रतीक मेहता, व्यवस्थापक सनी परिहार याच्यासह पाच वेटरवर गुन्हा दाखल केला आहे. मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, मालकाच्या सांगण्यावरूनच हे हुक्का पार्लर गुपचूप चालवले जात होते. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे २२ हजार ५६० रुपयांचे हुक्का साहित्य आणि मुद्देमाल जप्त केला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 8:16 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात बाहेरून हॉटेल लॉक; दरवाजा तोडताच आत अंधार अन् प्रचंड गर्दी, सत्य समजताच पोलीसही हादरले









